अमिताभ यांनी शेअर केलेला गाढवाचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

बिग बी यांचा सोशल मिडीयावर वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. बिग बी यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप हसायला भाग पाडतोय.

मुंबई- सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असताना नेहमी कामात व्यस्त असणारे सेलिब्रिटीही सामन्यांप्रमाणे घरातंच वेळ घालवत आहेत. विशेष म्हणजे बरेचसे सेलिब्रिटी यानिमित्ताने सोशल मिडियावर जास्त ऍक्टीव्ह झाले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन देखील कोरोना व्हायरसच्या या संकटात लोकांना जागरुक करण्यासाठी सोशल मिडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतात. कधी ब्लॉग लिहून तर कधी व्हिडिओ तयार करुन बि बी या काळात लोकांना सुरक्षिततेसाठी घरातंच राहण्याचं आवाहन करताना दिसून आले आहेत. यादरम्यान बिग बी यांचा सोशल मिडीयावर वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आहे. बिग बी यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हे ही वाचा: रवी जाधवने शेअर केला अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ

अमिताभ यांनी ट्वीटवर शेअर केलेला हा व्हिडिओ प्रेक्षकांना खूप हसायला भाग पाडतोय. अशोक मेस्त्री नावाच्या एका माणसाने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, 'लॉकडाऊनमध्ये मानसिक संतुलन बिघडल्यानंतर गाढवाशी बोलणारा संशयित??'  बिग बींनी अशोक मेस्त्री नावाच्या माणसाचा हा व्हिडिओ रिट्वीट करत त्यावर 'हो' असं उत्तर लिहिलंय.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोकंसुद्धा हा व्हिडिओ आवडिने पाहून स्वतःचं मनोरंजन करुन घेत आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत ६० हजार पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तसंच अनेकजण या व्हिडिओवर मजेदार कमेंट देखील लिहीत आहेत. बिग बी नेहमीच सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात आणि त्यांच्याशी विचार शेअर करत असतात. 

भारतात सध्या कोरोनामुळे बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आत्तापर्यंत ही संख्या २८ हजाराच्या वर गेल आहे. तर ८८६ लोकांचा आत्तापर्यंत जीव गेला आहे. कोरोनाची संख्या कमी होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत त्यामुळे ३ मे पर्यंतचा लॉकडाऊन आणखी वाढणार की  यातून मुक्त होणार याचीच सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.  

amitabh bachchan shares a video on twitter viral on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan shares a video on twitter viral on social media