अमिताभ यांनी जाहिर केला 'वसियतनामा'; अभिषेक कुटुंबाचा 'नवा उत्तराधिकारी' Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan & Abhishek Bachchan

अमिताभ यांनी जाहिर केला 'वसियतनामा'; अभिषेक कुटुंबाचा 'नवा उत्तराधिकारी'

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) आपला मुलगा अभिषेक(Abhishek Bahchcan) याच्याविषयी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. अभिषेकचा 'दासवी' ट्रेलर प्रदर्शित झाल्यांनतर सर्व स्तरातून त्याचं कौतूक होताना दिसत आहे. त्यानिमित्तानं खरंतर अमिताभ यांनी हा भावनिक ब्लॉग लिहिला आहे. 'अभिषेक हा माझा खरा उत्तराधिकारी आहे' असं त्यांनी लिहिलंय.

अमिताभ बच्चन यांनी अभिषेकविषयी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, ''एका वडिलांसाठी आपल्या मुलांचं यश अनुभवण्याशिवाय वेगळा आनंद काय असू शकतो, मुलाचं नाव प्रसिद्ध होताना पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अभिषेकचा वडील म्हणून मला लोकांनी ओळखणं आणि अभिषेकने ही अशी ओळख अनुभवण्याची संधी मला देण हे मी माझं भाग्य समजतो''. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आपले वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या 'वसियतनामा' या कवितेतील,वसीयत की विरासत ही ओळ देखील त्या ब्लॉगमध्ये लिहिली आहे. बिग बी यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिलं आहे,''मी खूप अभिमानाने हे सांगू शकतो की अभिषेक माझा उत्तराधिकारी आहे,त्याचे प्रयत्न आणि वेगवेगळ्या भूमिकांना करण्याचा ध्यास,कठीण भूमिकाही सहज पेलण्याची त्याच्यातली धमक,हे केवळ एक आव्हान नाही तर एक आरसा देखील आहे, सिनेमाचं विश्व,अभिनेता म्हणून त्याच्यातील क्षमता,आणि त्याची विश्वासार्हता,दृढता आत्मसात करण्यासाठी''.

अभिषेक बच्चनला उगाचच नको त्या कारणांनी ट्रोल करणाऱ्यांना देखील अमिताभ यांनी चांगलं उत्तर दिलं आहे.''जे आपल्यातील क्षमता जाणून घेता उगाचच दुसऱ्याच्या सक्षमपणावर बोट ठेवतात,त्यांची निंदा करतात, ते फक्त त्यांच्याकडे असलेल्या विषयाच्या अज्ञानामुळे''.अभिषेकनं 'रीफ्युजी' सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्याची तुलना अमिताभ यांच्यासोबत केली गेली.

हेही वाचा: अमेरिकेत स्वरा भास्करला कार ड्रायव्हरनं लुबाडलं;सामान घेऊन झाला फरार

खरंतर,यासंदर्भात नेहमीच अभिषेकनं त्याला केवळ अभिनेता म्हणून पहा,वडिलांशी तुलना करून नका असं जाहिरपणे सांगितलं आहे. ''माझी तुलना माझ्या वडिलांसोबत केलीत तर हे माझ्यासोबत अन्याय केल्यासारखं होईल. कारण ते महान अभिनेता आहेत'',असं तो अनेकदा मुलाखतीतून म्हणाला आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित 'दासवी' मध्ये अभिषेक,यामी गौतमी,निम्रत कौर असे कलाकार दिसणार आहेत.

Web Title: Amitabh Bahchan New Emotionak Blog For Abhishek

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top