Prasad - Amruta Wedding: "मी नसेल सोबतीला पण...", लेकीसाठी अमृताच्या बाबांची खास कविता! सर्वांचेच डोळे पाणावले

प्रसाद जवादे - अमृताच्या संगीत सोहळ्यामध्ये अमृताच्या बाबांनी कविता म्हटलीय
amruta deshmukh father poem at amruta - prasad wedding everyone emotional video viral
amruta deshmukh father poem at amruta - prasad wedding everyone emotional video viral SAKAL

मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेतलं कपल म्हणजे प्रसाद जवादे - अमृता देशमुख. प्रसाद - अमृता आज १८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.

काल प्रसाद - अमृता यांचा हळद - संगीत सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला अमृताच्या बाबांनी लाडक्या लेकीसाठी खास कविता म्हटली. ही कविता वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

(amruta deshmukh father poem at amruta - prasad wedding)

amruta deshmukh father poem at amruta - prasad wedding everyone emotional video viral
Tiger 3 Event: 'सीरियल किसर' इम्रान हाश्मीला भाईजाननेच केलं किस, व्हिडीओ बघा

अमृताच्या बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात मागे अमृता - प्रसाद एकमेकांचा हात धरून उभे आहेत. तर अमृताचे बाबा कविता म्हणतात की,

नाचण्यात दंग होते असे की हरवल्या होत्या त्यांच्या दिशाही,

गुंतले होते जीव असे की डोळ्यात दिसत होतं यांना सर्वकाही,

प्रीतीचा बहर फुलला असा काही त्या गंधाची चढली होती नशाही,

आपण दोघं केवळ दोघं दुसरं कुणीही नाही,

अमृताचे बाबा पुढे म्हणतात,

भल्या माणसा एक जरा मी सांगतो गुपित तुला,

मी तिला आणि तिने मला रे पहिला वहिला श्वास दिला,

सांगेल तुला ती अर्थ जगाचाआधी तिने माझ्यातच पाहिला,

मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांग

त्या तिच्या शांत श्वासांना, झोपेतल्या मिश्किल हसण्याला,

दुधाचा वास जेव्हा आला तिच्या नाजूक साजूक ओठांना

मी कसा विसरू सांग? मी कसा विसरू सांग

अमृताच्या बाबांनी कवितेच्या शेवटच्या ओळीत म्हटलंय की,

कुशीतल्या त्या क्षणांना, तिच्या माझ्या मिठीला,

हृदयातून गलबलताना घेतलेल्या चिमुकल्या मुक्याला,

आणि इवल्या इवल्या बोटांनी बोट माझं धरायला,

बोबड्या बोबड्या बोलांनी बाबा म्हणून हसण्याला,

आठवतंय अजूनही, ओढलेली मिशी, तुटलेला चष्मा आणि फेकलेलं पेन

ओळखीची चाहूल, मारलेली मुसळी आणि तुटलेली चैन,

अरे असेल जर ही जगरहाटी तर काळही बदलेल कधी कुशीला

नसेनही मी सोबतीला, नसेल अडसर तुला

पण स्मरशील मला तिच्या पहिल्या प्रेमाला,

मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं,

मी तिच्यावर पहिलं प्रेम केलं होतं.

अशी कविता करत अमृताच्या बाबांनी लाडक्या लेकीसाठी कविता सादर केली. बाबा कविता वाचताना अमृता देशमुख भावुक झालेली दिसली. ही कविता वाचुन प्रत्येक मुलीच्या डोळ्यात पाणी येईल.

प्रसाद - अमृता आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com