अमृता फडणवीसांचं दिवाळीनिमित्त नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला; सोनू निगमची स्वरसाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृता फडणवीसांचं दिवाळीनिमित्त नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला; सोनू निगमची स्वरसाथ

अमृता फडणवीसांचं दिवाळीनिमित्त नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला; सोनू निगमची स्वरसाथ

मुंबई: अमृता फडणवीस त्यांच्या गायन कौशल्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नवनव्या गाण्यांचे वेध चाहत्यांना लागलेले असतात. अमृता फडणवीसांच्या गाण्यासाठी चाहते चातकासारखी वाट पाहत असतात. त्यांनी वेगवेगळी गाणी गाऊन आपली कला लोकांसमोर सादर केली आहे. आता त्यांचं एक नवं गाणं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे. येत्या दिपावलीच्या पार्श्वभूमीवर त्या हे गाणं रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे. याबाबतची माहिती फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, महालक्ष्मीची आरती लवकरच श्रोत्यांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील टाकल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. 'ओम जय लक्ष्मी माता' असं या आरतीचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृताजींचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. गेल्या महिला दिनी देखील त्यांचे एक गाणे प्रदर्शित झाले होते. गायनाच्या माध्यमातून केवळ सांस्कृतिकच नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील त्या परखडपणे भाष्य करतात. ठाम भूमिका घेण्यासाठीही त्या प्रसिद्ध आहेत. अमृता फडणवीस यांना बरेचदा सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं देखील दिसून आले आहे. अमृता यांच्या या अगोदरच्या अनेक गाण्याच्या व्हिडिओजच्यावेळी देखील त्यांना अशाच प्रकारे ट्रोल केले गेले होते.

Web Title: Amruta Fadnavis News Song Coming Up Next Diwali Aarti Of Mahalakhsmi With Singer Sonu Nigam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..