Video : 'तेरी बन जाऊंगी' अमृता फडणवीसांचा ग्लॅमरस अंदाज

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गाण्यामध्ये मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणं 05 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता अमृता यांचा आणखी एक गाण्याचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तेरी बन जाऊंगी असे या गाण्याचं नाव असून टी-सीरिजने त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. 

गाण्यामध्ये मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. हे गाणं 05 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. यापूर्वी त्यांनी बिग बींसोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amruta Fadnavis Teri Ban Jaungi Song Teaser Out Now