Amruta Fadnavis: 'वो तेरे प्यार में'! अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंय? |Amruta Fadnavis Woh Tere Pyar Ka Gham viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Amruta Fadnavis

Amruta Fadnavis: 'वो तेरे प्यार में' अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंय?

Amruta Fadnavis Woh Tere Pyar Ka Gham: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या बहारदार गायकीसाठी ओळखल्या जातात. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांचे नवे गाणे आले की, त्याला नेटकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. आता त्यांचे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे वो तेरे प्यार का गम नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अमृता या नेहमीच वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या गाणी व्हायरल करत असतात. विशेषत, नवरात्र, गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी गायलेल्या गाण्यांचे चाहत्यांनी कौतूक केले आहे.

आता युट्युबवर व्हायरल झालेल्या वो तेरे प्यार का गमची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. ते गाणं केव्हा प्रदर्शित होणार याविषयी अमृता यांनी माहितीही दिली होती. आतापर्यत या गाण्याला 15 लाख व्ह्युज मिळाले आहे. सारेगमपच्या वतीनं त्या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांची ओळख सोशल मीडिया सेलिब्रेटी अशी करुन दिली जाते. वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे बोलणे, ठाम भूमिका घेणे यामुळे त्या चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल देखील भाष्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. मात्र टीकाकारांना परखड भाषेत उत्तर अमृता ताईंनी दिले होते.

हेही वाचा: VIDEO : 'आप'चा खासदार हरभजनची 'राज्यसभा' इनिंग सुरू

सोशल मीडियावर अमृता ताईंचे गाणे व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींनी त्यांच्या गाण्याला उस्फुर्त दाद दिली आहे. त्यांच्या नव्या गाण्यासाठी नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. अमृता ताईंनी गायलेलं मुळ गाणं मुकेश यांनी गायलं आहे. आनंद बक्षी यांनी ते गीतलेखन केले आहे.

हेही वाचा: Video: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अभिनेत्री विशाखा सुभेदारची एण्ट्री

Web Title: Amruta Fadnavis Woh Tere Pyar Ka Gham Viral Re Creation Mukesh Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top