Amruta Khanvilkar Birthday: 'वाजले की बारा'नं अमृताचं नशीबच पालटलं.. कसं ते वाचा..

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घ्या हा खास किस्सा..
Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more bright
Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more brightsakal

Amruta Khanvilkar : सध्या अभिनेत्री अमृता खालविलकरची जोरदार हवा आहे. एकामागोमाग एक केलेले दर्जेदार प्रोजेक्ट आणि बॉलीवुडमधला वावर यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे. 'चंद्रमुखी' या चित्रपटाने तिला वेगळीच ओळख मिळवून दिली. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटातूनही ती झळकली.

विशेष म्हणजे हिंदीतील 'झलक दिखला जा' या डान्स शो मध्ये अमृताचा डान्स पाहून बॉलीवुडही तिच्यावर फिदा झाले. असे असले तरी तिचे 'वाजले की बारा' ही गाणे आपण कधीच विसरू शकणार नाही.

आज अमृताचा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊन अमृता आणि वाजले की बाराचे खास कनेक्शन.. ज्याने तिचं नशीब चमकलं..

(Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more bright)

Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more bright
Bigg Boss Marathi 4: शहाणपणा नडला! बिग बॉस कडून अमृता धोंगडेला जबर शिक्षा..

अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. फक्त अभिनय आणि सौंदर्यच नाही, तर कोणत्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण न घेता अमृताने तिच्या डान्सने (amruta khanvilkar dance) प्रत्येकाला थक्क केलं आहे. तिच्या नृत्याची पहिली छाप रसिकांच्या मनावर पडली तर 'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा' या गाण्याने.. ही गाणे तिच्या करियरसाठी फार महत्वाचे ठरले. तुम्हाला धक्का बसेल पण या गाण्यासाठी अमृता खानविलकर ऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

Amruta Khanvilkar Birthday her wajle ki bara superhit song was change her career more bright
Amey Wagh: मराठमोळ्या अमेय वाघवर विकी कौशल फिदा.. म्हणाला, मित्रा तुझ्यासोबत..

रवी जाधव दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'नटरंग' हा बहुचर्चित सिनेमा प्रत्येकाला आजही आठवत असेल. या चित्रपटाने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. तमाशापट संकल्पनेवर आधारलेल्या या चित्रपटाची सुरुवात होते ते 'वाजले की बारा' या गाण्याने. आणि एक देखणी, रूपवान, पिवळी साडी-लाल चोळी नेसलेली, शृंगार केलेली आणि पायात घुंगरू बांधलेली तरुणी समोर येते, आणि काळजाचा ठोका चुकतो. ती तरुणी म्हणजे आपली अमृता खानविलकर.

तिच्या 'वाजले की बारा' या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. लावणी म्हणजेच वाजले की बारा हे समीकरण तयार झालं. घरी-दारी हेच गाणं वाजत होतं. पण या गाण्यासाठी अमृता पहिली पसंती नव्हती. या गाण्यासाठी एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. पण काही कारणास्तव ऐनवेळी तिने या गाण्याला नकार दिला. मग रवी जाधव यांनी या गाण्यासाठी अमृताला विचारणा केली आणि तिनेही होकार दिली. या गाण्यावर अमृताने विशेष मेहनत घेतली. पारंपरिक पोशाख, पायातील वजनदार घुंगरु सोबत नाचणे कठीण होते पण अमृताने जमवले.

पुढे हे गाणं आणि अमृता दोघेही हिट झाले. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होती. पण केवळ एकच लावणी करून अमृता पूर्ण भाव खाऊन गेली होती. या गाण्याने अमृताचे नशीब पालटले. त्यानंतर अमृताला अनेक चित्रपट चालून आले. विविध डान्स शो मध्येही ती झळकली. सध्या 'चंद्रमुखी'चित्रपटातून ती 'चंद्रा' म्हणून झळकली असली तरी त्याचेही मूळ 'वाजले की बारा' मध्येच दडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com