
Kalavati: Amruta Khanvilkar ची 'कलावती' येतेय, ओंकार भोजने सोबत जमणार जोडी, लोकप्रिय कलाकारांची फौज
Amruta Khanvilkar New Movie Kalavati: अमृता खानविलकरने चंद्रमुखी सिनेमातून सर्वांच्या काळजात घर केलं. आता अमृता खानविलकर कलावती सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलावती सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. यात पडद्याआड अमृता खानविलकरची रहस्यमय नजर दिसतेय. कलावती मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असून अमृताची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सोबत जमणार आहे.
( Amruta Khanvilkar new movie 'Kalavati', paired with Omkar Bhojane)
रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्ते प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते. तसंच, चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमनं देखील मुहूर्त सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.
चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.
कलावतीचं पोस्टर पाहून अमृता खानविलकर पुन्हा एकदा लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. पण लावणी आणि कलावतीचा काहीही संबंध नाही.
कलावती निमित्ताने पहिल्यांदाच संजय जाधव हॉरर कॉमेडी प्रकाराचं दिग्दर्शन करणार आहेत. अमृता खानविलकर सुद्धा प्रथमच मराठी सिनेमात अशी आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे.
आतापर्यंत संजय जाधव यांनी 'दुनियादारी','प्यारवाली लव्हस्टोरी','तू ही रे','लकी','चेकमेट', 'खारी बिस्किट', 'ये रे ये रे पैसा','तमाशा लाइव्ह' अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
पण आता पहिल्यांदाच संजय जाधव 'कलावती' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन भेटीस येत आहेत त्यामुळे निश्चितच उत्सुकता आहे.
अमृता खानविलकर,संजय नार्वेकर,तेजस्विनी लोणारी,अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे,ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे,संजय शेजवळ,नील साळेकर(इन्फ्लूएन्सर) अशी कलाकारांची तगडी टीम 'कलावती' या चित्रपटात दिसणार आहे.
के.एफ. फिल्म्स लिमिटेड,ताहेर सिने टेक्निक्स , अमेय खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्वाती खोपकर प्रस्तुत 'कलावती' चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रजय कामत यांनी उचलली आहे.
तर सह-निर्माते म्हणून निनाद नंदकुमार बत्तिन,तबरेज पटेल,परीन मेहता,निश्चय मेहता, नवीन कोहली काम सांभाळणार आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून वैशाली तुथिका आणि सावित्री धामी काम पाहतील.
दिग्दर्शनाची जबाबदारी उचलण्यासोबतच संजय जाधव हे 'कलावती' चित्रपटाचे 'डीओपी' म्हणूनही काम पाहणार आहेत. चित्रपटाचे संगीतकार पंकज पडघन हे असणार आहेत.
मराठीतील प्रसिद्ध लेखक अभिजित गुरुनं चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर चित्रपटाची कथा निशांत भुसे आणि अनुजा कर्णिक यांची आहे.
कलावती रिलीज कधी होणार याचा उलगडा अजून झाला नसला तरीही दिग्गज कलाकारांची फौज असल्याने सिनेमा प्रेक्षकांचं पुरेपर मनोरंजन करणार यात शंका नाही. सिनेमाच्या मुहूर्त शॉटला सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते