प्रेग्नंसीच्या 8व्या महिन्यात एमीनं केलं टॉपलेस फोटोशूट; पाहा फोटो

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. सध्या एमी तिचा प्रेग्नंसी पिरियड एंजॉय करत असून अनेकदा ती सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचे आपले फोटो शेअर करताना दिसते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रेग्नंसीच्या काळात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना यातून दिसत आहेत.

मुंबई : आजकाल अभिनेत्री आपला प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करताना दिसतात. त्या बेबी बंपसोबत कॅमेऱ्यासमोर येतात. सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसी काळातले फोटो शेअर करतात. एवढंच नाही तर प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही करतात. काही दिवसापूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डीनं अंडर वॉटर फोटोशूट केल्यानंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं प्रेग्नंसीमध्ये चक्क टॉपलेस फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. सध्या एमी तिचा प्रेग्नंसी पिरियड एंजॉय करत असून अनेकदा ती सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचे आपले फोटो शेअर करताना दिसते. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रेग्नंसीच्या काळात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना यातून दिसत आहेत.
 
एमी जॅक्शनसुद्धा सध्या तिच्या टॉपलेस फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. एमीनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amy Jackson announces pregnancy on Instagram