Singer KK Death: 'केके सरांची तब्येत तर..' म्हणत इवेंट कंपनीने झटकले हात

अनेकांनी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना आणि इवेंट कंपनीला कारणीभूत ठरवले आहे.
Who is responsible for KK's Death ?
Who is responsible for KK's Death ?esakal
Updated on

केकेच्या मृत्यूने जिथे सगळ्यांना दु:ख झालं होतं तिथे केकेच्या मृत्यूच्या कारणाचे रोज नवनवे पैलू पुढे येत आहे.परफॉमन्स संपल्यावर केके यांना कार्यक्रमस्थळीच हृदयविकाराचा(Heart Attack) झटका आला होता.त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CMRI) येथे नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केल्या गेले.

केकेच्या शेवटच्या कॉन्सर्टचे बरेच फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल होत आहे.(Event company)त्याच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे असा सगळीकडे प्रश्न उपस्थित होतोय.अनेकांनी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना आणि इवेंट कंपनीला कारणीभूत ठरवले आहे.

मात्र इवेंट कंपनीने यावर तोडगा काढत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.तसेच त्यात,"केके मृत्यूप्रकरणाशी इवेंट कंपनीचा काहीही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहे.कॉन्सर्टच्या वेळी बंद सभागृहात खूप गर्दी असल्याने एसी काम करत नव्हते अशी तक्रार सोशल मीडियावर होत होती.(Singer KK)त्यावर इवेंट कंपनीने स्पष्टीकरण देत इवेंटच्या वेळी एसी काम करत असल्याचे सांगितले आहे.इवेंटच्या वेळी क्षमतेपेक्षा जास्त लोकं होते हे मान्य करत एसी मात्र सुरळीत सुरू असल्याचे इवेंट कंपनीने पत्रकात लिहीले आहे."

पुढे कंपनीने लिहीले आहे की,"परफॉर्म केल्यानंतर केके सरळ त्यांच्या हॉटेलकडे रवाना झाले होते.तिथे पोहोचल्यानंतरही त्यांनी त्यांच्या फॅन्स सोबत काही सेल्फिज काढल्या होत्या.केके हॉटेलात गेल्यावरच आजारी पडले आणि ही बाब हॉटेलत्या मॅनेजरकडूनही कन्फर्म केल्याचा दावा इवेंट कंपनीने केलाय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com