अनन्याचा 'गृहप्रवेश' शाहिदच्या घरात? अभिनेत्रीचा खुलासा Ananya Panday | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ananya Panday, Shahid Kapoor

अनन्याचा 'गृहप्रवेश' शाहिदच्या घरात? अभिनेत्रीचा खुलासा

अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गहराइयां' सिनेमामुळे. त्याव्यतिरिक्त बोल्ड अॅन्ड ब्युटिफुल अनन्या सध्या चर्चेत आली आहे ते तिच्या रीलेशनशीप स्टेट्सवरील वक्तव्यामुळे देखील बरं का. आता अनन्या ईशान खट्टरला डेट करतेय या अफवा गेल्या काही दिवसांपासून कानावर येतच होत्या. कारण ते नेहमीच सार्वजनिक ठिकाणी म्हणजे अनेक कार्यक्रमातनं,पार्टीजमधून एकत्र दिसायचे. त्यावरनं आता अंदाज लागतोच नाही का. पण नुकत्याच एका मुलाखतीत चाहत्यांनी तिच्या आणि ईशानच्या नात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना खास अंदाजात उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा तर तिनं चाहत्यांच्या प्रश्नाकडे ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं पण नंतर जेव्हा एकानं विचारलं,'तू सिंगल आहेस का?' त्यावर अनन्या म्हणाली,'मी खूश आहे'. आता यावरनं एक तर दोन गोष्टी कळतात, आता यावरनं एक तर दोन गोष्टी कळतात,माणूस सिंगल असतानाही खूश असतो तर कधी जोडीदाराची सोबतही माणसाला खूश ठेवते. म्हणजे नेमकं अनन्या कोणत्या गोष्टीकडे बोट दाखवते आहे,हे तिचं तिलाच माहित.

हेही वाचा: अक्षयच्या 'पृथ्वीराज'ला प्रदर्शनाच्या तारखेनं पुन्हा दिला चकमा

त्याच मुलाखतीत अनन्याला एका चाहत्यानं विचारलं की,'तुझा फेव्हरेट सहकलाकार कोण?' तिनं लगेचच ईशान खट्टरचं नाव घेतलं. नंतर ती म्हणाली लगेच की तिनं आतापर्यंत जितक्या सिनेमांतून काम केले आहे,त्यातील सर्वच पुरुष कलाकार तिचे फेव्हरेट आहेत. सिद्धांत चतुर्वेदीसोबत ती पुन्हा 'खो गये हम कहॉं' सिनेमात दिसणार आहे

हेही वाचा: कंगनाच्या 'लॉकअप' मध्ये फसला 'बिग बॉस' चा माणूस; नवीन रंजक वळण

काही दिवसांपू्र्वीच अनन्यानं शाहिद(Shahid Kapoor)च्या ४१ व्या वाढदिवस निमित्तानं त्याच्या घरातील सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला होता. या फोटोत ती ईशार खट्टरसोबतच अधिक दिसतेय. पार्टीतले त्यांचे फोटो तेव्हा व्हायरलही झाले होते. तेव्हा 'समझने वाले को इशारा काफी है' या अंदाजात सगळ्यांना जे कळायचं ते कळून गेलं बरं का. अनन्याचा 'गहराइयां' सिनेमा ईशाननं तिच्यासोबतच पाहिला होता. तेव्हा देखील त्यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. ''ईशान आपला सिनेमा पुन्हा पाहणार आहे,कारण त्याला तो खूप आवडला आहे'',असंही तिनं न विचारताच एका मुलाखतीत सांगितलं होतं.

हेही वाचा: लाईव्ह सेशनमध्ये शाहरुख 'आता माझी सटकली' च्या आवेगात;आमिरचं निमित्त...

त्याच मुलाखतीत तिनं ईशानच्या प्रशंसेचा मनोराच बांधला होता. ईशानचा माझ्यावर कसा प्रभाव आहे,तो आजुबाजूला असला की सगळं प्रेमाचं,सहकार्याचं,पाठिंब्याचं वातावरण असतं. तो कसा प्रेमळ आहे,गोड आहे वगैरे,वगैरे...आता तो फक्त मित्र,आवडता सहकलाकार आहे या तिच्या बोलण्यावर कोण बरं हे सगळं ऐकल्यावर विश्वास ठेवेल. असो,चाहत्यांनी मात्र तिला कधीच शाहिद कपूरची वहिनी म्हणून पसंत केलंय बरं का.

Web Title: Ananya Panday Reacts To Her Relationship Statuswhy Shahid Name Is In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..