अन् अक्षयने लगावली विद्या बालनच्या कानाखाली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

अक्षय कुमार आणि विद्या बालनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार विद्या बालनच्या कानाखाली लगावताना दिसत आहे.

ज्या चित्रपटाची लोकांनी खुप वाट पाहिली तो 'मिशन मंगल' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये खुप तगडी स्टार कास्ट आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नु अश्या कालाकारांनी रंगलेला सिनेमा प्रेक्षकांना स्वत:कडे खेचत आहे. दरम्यान नुकताच अक्षय कुमार आणि विद्या बालनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार विद्या बालनच्या कानाखाली लगावताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये  विद्या बालन आणि अक्षय कुमार भांडण्याचे नाटक करताना आपल्याला दिसत आहेत. अक्षय कुमार अतिशय फिल्मी पध्दतीने विद्या बालनला मारताना दिसत आहे. तर विद्या बालनही त्याला चांगलेच प्रतिउत्तर देते. हे त्यांच मस्तीमधल भांडण सोनाक्षी सिन्हाने शुट केलय असे म्हटले जात आहे. विद्या भांडणात विजयी होते, आणि सोनाक्षी तिची प्रशंसा करते.  असा हा मजेशीर व्हिडिओ एक सध्चया चर्चेचा विषय आहे. 

काल प्रदर्शित झालेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट भारताच्या मंगळ प्रवासावर आधारित आहे . या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And Akshay slapped Vidya Balan!