esakal | नेहाचा फोन का चेक केला? अंगद बेदीनं सांगितलं कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Neha Dhupia

नेहाचा फोन का चेक केला? अंगद बेदीनं सांगितलं कारण..

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अभिनेता अंगद बेदी (Angad Bedi) हे बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. तीन वर्षांपुर्वी नेहा आणि अंगदनं लग्न केले. त्यानंतर त्यांना मेहेर नावाची मुलगी झाली. या रोमँटिक जोडीची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते. गेल्या वर्षी नेहाने सोशल मीडियावर 'नेव्हर हॅव ऑय एवर' हा खेळ अंगदसोबत खेळला होता. त्यामध्ये नेहाने अंगदला काही प्रश्न विचारले होते. यावेळी एका प्रश्नाचे अंगदने असे उत्तर दिले ज्याने नेहाला धक्का बसला.(Angad Bedi confessed snooping into Neha Dhupia phone SI have checked your phone many times)

नेहानं या खेळा दरम्यान अंगदला प्रश्न विचारला, 'तु माझा फोन कधी चेक करतोस का?' तेव्हा अंगदने उत्तर दिले, 'हो मी अनेक वेळा तुझा फोन चेक केला. तु तुझ्या सासूला काय मेसेज करते हे पाहण्यासाठी मी तुझा फोन चेक करतो.' अंगदने नेहाला दिलेले उत्तर ऐकुन सर्वांनाच हसू आले. मात्र अंगदचे हे बेलणे ऐकून नेहा आश्चर्यचकित झाली. अंगद नेहमी नेहा आणि मेहरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तिघांच्या फोटोंना नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते.

हेही वाचा: 'सगळ्यांना मदत करायची तर १४ वर्षे लागतील'...

हेही वाचा: "मी दिलेले पैसे पचवतेसही आणि.."; श्वेता तिवारीला अभिनवचं प्रत्युत्तर

नेहा आणि अंगद एकत्र कधीच प्रेक्षकांच्या भेटीस आले नाही. दोघांच्या चाहत्यांना हा प्रश्न नेहमी पडतो कि, हे दोघे रूपेरी पडद्यावर एकत्र कधी काम करणार? याबद्दल अंगदने एका मुलाखतीत सांगितले, 'मला तिच्यासोबत काम करायाला खूप आवडेल पण ते कास्टिंग करणाऱ्यांवर अवलंबून आहे. हे निर्णय आमच्या हातात नसतात. आम्ही एकत्र काम करावे अशी अजून एकही स्क्रिप्ट आमच्याकडे आली नाही. लवकरच आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगतो.'

loading image