Angad Bedi: अभिनेता अंगद बेदीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, वडील बिशनसिंग बेदींना अनोखी श्रद्धांजली!

अंगद बेदीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावुन वडीलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे
Angad Bedi wins gold medal in sprinting tournament, dedicates to his father Bishan Singh Bedi
Angad Bedi wins gold medal in sprinting tournament, dedicates to his father Bishan Singh Bedi SAKAL

Angad Bedi News: काहीच दिवसांपुर्वी भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालंय. बिशनसिंग बेदी यांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली.

बिशनसिंग बेदी यांचा मुलगा अंगद बेदी हा बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अंगदने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावुन वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

(Angad Bedi wins gold medal in sprinting tournament, dedicates to his father Bishan Singh Bedi)

Angad Bedi wins gold medal in sprinting tournament, dedicates to his father Bishan Singh Bedi
Ashvini Mahangade: "तर तुमचं आडनाव मुल्ला - खान असतं", अश्विनी महांगडेने छत्रपती शिवरायांप्रती केलं ऋण व्यक्त

अंगदने सुवर्णपदक केलं वडीलांना केलं समर्पित

अभिनेता अंगद बेदीने वडिलांच्या स्मरणार्थ दुबईत झालेल्या 400 मीटर शर्यतीत भाग घेतला आहे. अंगदच्या या गोष्टीचं सगळीकडे कौतुक झालं. पण आता मात्र अंगदने या स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावुन वडील बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बेदी कुटुंबाला अंगदचा अभिमान

अभिनेता अंगद बेदीने दुबई येथे झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा कारकीर्दीची सुरुवात केली आहे.

यावेळी अंगदच्या कुटुंबापासून त्याच्या फॅन्सना सर्वांना त्यांचा अभिमान वाटला. यामागील कारण म्हणजे अंगदने केवळ या शर्यतीत भाग घेतला नाही. तर ही शर्यत जिंकून त्याने पुन्हा एकदा आपल्या वडिलांचा नाव मोठं केलं आणि त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.

सुवर्णपदक वडिलांना समर्पित करुन अंगद लिहीतो..

अंगद बेदीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कामगिरी शेअर करत लिहिले, “मला अजिबात धैर्य नव्हते.. मी मानसिक आणि शारीरिक रित्या सज्ज नव्हतो. पण वरून एका बाह्य शक्तीने मला पुढे जाण्यास भाग पाडले.

मी माझ्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हतो, पण कसे तरी मी ही शर्यत पार पाडली. हे सुवर्णपदक माझ्यासाठी नेहमीच खास असेल. "माझ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद बाबा... मला तुमची खुप आठवण येते." अशी पोस्ट करत अंगदने स्पर्धेचे खास क्षण सर्वांसोबत शेअर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com