अनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे. चित्रपट, 
मालिका अन्‌ नाटकांमध्ये अनोखी भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा अनिल चव्हाण हिच्याशी त्याचे लग्न झाले.

मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे. चित्रपट, 
मालिका अन्‌ नाटकांमध्ये अनोखी भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा अनिल चव्हाण हिच्याशी त्याचे लग्न झाले.

या लग्नाची गोष्टही अनोखीच आहे. अनिकेतची मावशी अन्‌ स्नेहा कोथरूडमधील करिष्मा सोसायटीत राहतात. एके दिवशी स्नेहाची आई व अनिकेतची मावशी वॉकला जात असताना, त्यांच्यामध्ये स्नेहाच्या लग्नाबद्दल चर्चा झाली. त्यांनी अनिकेतबद्दल सांगितले अन्‌ अवघ्या एका बैठकीत चार महिन्यांपूर्वी त्यांची एंगेजमेंट झाली. विशेष म्हणजे "हृयात समथिंग-समथिंग' या चित्रपटात दोघांनीही मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर लग्नाबद्दलच्या या सर्व गोष्टी झाल्या. तोपर्यंत ते एकमेकांचे सहकलाकारच होते.

पानशेतजवळील निसर्गरम्य परिसरात असलेल्या गुलमोहर व्हिलेजमध्ये सोमवारी अनिकेत अन्‌ स्नेहाचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. हा सोहळा तीन दिवस चालला होता. या वेळी भरत दाभोलकर, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, हेमंत ढोमे, क्षिती जोग, स्नेहा रायकर, अपूर्व रांजणकर यांच्यासह कलाकार व नातेवाईक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aniket Vishwasrao was the son in law of Pune