अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांच्यात 'या' कारणामुळे सुरु आहे ट्विटर वॉर

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 7 December 2020

दिग्दर्शक अनुराग कश्यपने एकीकडे अनिल कपूर यांच्या बेकार सिनेमांची लीस्ट पुढे केली तर दुसरीकडे अनिल कपूर यांनी देखील बॉम्बे वेल्वेट आणि त्यांच्या करिअरला लागलेल्या ब्रेकची त्यांना आठवण करुन दिली.

मुंबई- सोशल मिडियावर तुम्ही अनेकदा लोकांना एकमेकांविषयी मत मांडताना पाहिलं आहे. या मतमतांतरामुळे कित्येकदा भांडण होऊन लोक ट्रोल होतात. सध्या तर बॉलीवूडमध्ये हे ट्विटर वॉर सगळ्यात जास्त पाहायला मिळतंय. नुकतंच कंगना आणि दिलजीत दोसांज शेतकरी आंदोलनावरुन एकमेकांशी भिडले होते. एकमेकांना खडे बोल सुनवत त्यांच्या ट्विटर वॉर सुरु झालं होतं. या दोघांचं उदाहरण ताजं असतानाच आता अनुराग कश्यप आणि अनिल कपूर या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा: सलमा आघा यांची मुलगी झाराला सोशल मिडीयावर बलात्काराची धमकी, आरोपी अटकेत

दिग्दर्शक अनुराग कश्यपने एकीकडे अनिल कपूर यांच्या बेकार सिनेमांची लीस्ट पुढे केली तर दुसरीकडे अनिल कपूर यांनी देखील बॉम्बे वेल्वेट आणि त्यांच्या करिअरला लागलेल्या ब्रेकची त्यांना आठवण करुन दिली. हे सगळं रविवारी खुल्लम खुल्ला सोशल मिडियावर पाहायला मिळालं. त्यांच्या या ट्विटरच्या वादात अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या, चर्चा केली. त्याचं झालं असं की रविवारी अनिल कपूर यांनी ट्विटरवर 'इंटरनॅशनल एमी ऍवॉर्ड' जिंकलेला सिनेमा 'दिल्ली क्राईम'ला शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांची खिल्ली उडवत अनुराग कश्यपने अनिल कपूरला विचारलं की त्यांचा ऑस्कर कुठे आहे? 

अनिल कपूर देखील यावर शांत बसले नाहीत आणि त्यांनी प्रत्युत्तर दिलं की, तुझ्यासाठी ऑस्कर सगळ्यात जवळचा तेव्हाच असला असेल जेव्हा तु हा सिनेमा टीव्हीवर पाहिला असशील? यानंतर अनुरागने निशाणा साधत म्हटलं, जर मी चुकीचा नसेन तर तुम्ही स्वतः या सिनेमासाठी दुसरी पसंत होतात.

हे ऐकल्यानंतर अनिल कपूर म्हणाले, मला घ्या अथवा घेऊ नका मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी काम काम असतं. तुझ्यासारखं काम शोधण्याच्या वेळी केस तर खेचावे लागत नाहीत. यावर पुन्हा अनुरागने डिवचलं आणि म्हणाला, सर तुम्ही केसांविषयी बोलू नका. तुम्हाला तर तुमच्या केसांवरंच भूमिका मिळत आहेत. या दोघांमधील हा वाद इथेच थांबला नाही तर दोघांनी एकमेकांच्या फ्लॉप सिनेमांची यादी देखील काढली. 

या संपूर्ण वादाबाबत खरं सांगायचं झालं तर अनुराग आणि अनिल यांनी हे सगळं नेटफ्लिक्ससाठी केलं आहे. लवकरंच ही जोडी AK v/s AK नावाच्या शोमध्ये येणार आहे आणि हा डिजीटल सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे हा सगळा वाद एक प्रमोशनल ड्रामा असू शकतो. हे सगळं ७ डिसेंबरला होणा-या पत्रकार परिषदेसाठी तयार केलं गेलं आहे.   

anil kapoor and anurag kashyap get into ugly twitter fight  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil kapoor and anurag kashyap get into ugly twitter fight