Anil Kapoor नी दिल्लीतील विमानात पकडला महिलेचा हात.. पुढे तब्बल 2 तास जे घडलं.. किस्सा नुकताच घडलाय..वाचाAnil kapoor holds hand of woman on tarbulent flight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil kapoor holds hand of woman on turbulent flight

Anil Kapoor नी दिल्लीतील विमानात पकडला महिलेचा हात.. पुढे तब्बल 2 तास जे घडलं.. किस्सा नुकताच घडलाय..वाचा

Anil Kapoor: अनिल कपूरसोबत विमानात प्रवास करणाऱ्या एका महिलेचा अनुभव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्याचं झालं असं की या महिलेला विमानात अचानक एंग्जायटीचा त्रास होऊ लागला. तिच्या जवळच बसलेल्या अनिल कपूर यांनी तिचा हात पकडून तिला खूप मानसिक आधार दिला.

शिखा नावाच्या या महिलेनं आपल्या लिंक्डइनवर हा अनुभव शेअर केला आहे. तिनं सांगितलं की,संपूर्ण विमान प्रवासात अनिल कपूर यांच्याशी ती गप्पा मारत राहिली आणि तिला आपला प्रवास कधी संपला हे कळलंच नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे होणाऱ्या त्रासाची भणकही नंतर तिला लागली नाही. तिनं अनिल कपूर यांच्यासोबत सेल्फी देखील घेतला...तिनं आपल्या पोस्टमध्ये अनिल कपूर सोबत तिनं काय काय गप्पा मारल्या या देखील शेअर केल्या आहेत.(Anil kapoor holds hand of woman on tarbulent flight)

शिखानं अनिल कपूर यांच्यासोबत सेल्फी शेअर करत लिहिलं आहे की,''अनिल कपूर यांच्यासोबत माझी विमान प्रवासातील भेट खूपच खास राहिली''. आणि पुढे मग तिनं अनिल कपूर यांच्याशी संवाद कसा सुरु झाला याविषयी लिहिले आहे.

तिनं लिहिलंय,''जसं फ्लाइटनं टेकऑफ केलं,माझ्या वर असलेला लगेज बॉक्स अचानक ओपन झाला आणि त्याचं फ्लॅप हलायला लागलं. टेकऑफ नंतर लगेच फ्लाइटमध्ये थोडा डिस्टर्बंस असल्याचं मला उगाचच जाणवू लागलं''.

''मला फ्लाइटमध्ये काही ना काही अडचण नेहमीच आतापर्यंत जाणवलीय. कोव्हिड आणि त्यानंतर घेतलेल्या व्हॅक्सीन डोसेजचा हा परिणाम आहे की २०२२ पासून माझ्या मनात एक विचित्र भीती वास करुन आहे''.

''जसं मी दोन्ही सीटच्या मध्ये असलेल्या डीव्हाईडरवर हात ठेवला,तेव्हा माझ्या सोबत प्रवास करणाऱ्या अनिल कपूरनी माझा हात पकडला आणि म्हटलं,'इट्स ओके'. तुमचं नाव सांगा. चला गप्पा मारूया''.

शिखा म्हणाली,''पुढचे २ तास विमानात मी त्यांच्याशी हसत-खेळत गप्पा मारत होते. आणि प्रवास कधी संपला ते माझं मलाच कळलं नाही''.

Anil kapoor holds hand of woman on turbulent flight

Anil kapoor holds hand of woman on turbulent flight

जेव्हा विमान लॅन्ड झालं तेव्हा जी व्यक्ती मी म्हणतेय ते दस्तुखुद्द अनिल कपूर होते..ते मला म्हणाले,''अनेकजण तुला म्हणतील की एंग्जायटी वाईट गोष्ट आहे पण आज यामुळेच तर आपण दोघं दोन तास हसत हसत गप्पा मारल्या. नाहीतर हे घडलंच नसतं. होऊ शकतं की दिल्लीत उतरल्यावर तू मला कॉफी देखील पाजशील. मी हसले आणि त्यांनी मला जाता-जात घट्टं मिठी मारली..आणि म्हणाले,शिखा द मित्तल बाय बाय..''

शिखानं हे देखील सांगितलं की कोणत्या गोष्टींवर तिनंअनिल कपूर यांच्याशी गप्पा मारल्या. तिनं लिहिलं आहे,'' १.एंग्जायटी २.त्यांनी मला माझं प्रोफेशन विचारलं त्यानंतर आम्ही फायनान्शिअल प्लानिंग,रिटायमेंट प्लान,मनी मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या.''

'' ३. आम्ही सिनेमांवर खूप बोललो. दरवर्षी एक सिनेमा करायचा त्यांचा प्लान आहे. ४. त्यांनी माधुरी-श्रीदेवी यांच्यावर देखील गप्पा मारल्या. ५. आम्ही 'लम्हे' सिनेमाविषयी बोललो..जो बॉक्सऑफिसवर चालला नाही पण अनेकांचा तरीदेखील फेव्हरेट सिनेमा आहे''.

''६.आम्ही अॅव्हरेज आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांवर बोललो. ७. आम्ही लक आणि अचानक घडणाऱ्या चांगल्या गोष्टींविषयी बोललो''.

शिखानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मुंबईत प्रॉपर्टी,फिटनेस आणि कॉफी विषयी असलेल्या दोघांच्या कॉमन जिव्हाळ्याच्या टॉपिकवरही गप्पा रंगल्या.