Kailash Kher:आत्महत्या करण्यासाठी गंगेत उडी मारलीच होती पण.., कैलाश खेरनं सांगितला आयुष्यातला टर्निंग पॉइंट Famous Singer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kailash Kher

Kailash Kher: आत्महत्या करण्यासाठी गंगेत उडी मारलीच होती पण..,कैलाश खेरनं सांगितला आयुष्यातला टर्निंग पॉइंट

Kailash Kher: कैलाश खेर बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक. त्याची गाणी लोकांच्या मनवार राज्य करतात असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी कैलाश खेरनं आपल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील जुन्या अडचणींच्या दिवसांची आठवण काढत एक किस्सा शेअर केला. जो ऐकून खरंतर सगळेच हैराण झाले.

कैलाशनं आपण गंगा नदीत उडी मारून आपलं जीवनं संपवणार होतो असा शॉकिंग अनुभव शेअर केला. पण त्याचं भाग्य होतं की त्यावेळी एका माणसानं येऊन त्याचा जीव वाचवला आणि त्याला यासाठी त्या माणसानं खूप फटकारलं होतं.

त्या वाईट प्रसंगाचा खुलासा करताना कैलाश खेर म्हणाला की संगीतासाठी आपलं प्रेम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला करावा लागलेला संघर्ष खूपच मोठा आहे. पण शेवटी याच संघर्षानं मला जगभरात प्रसिद्धि मिळवून दिली हे सांगायला मात्र कैलाश खेर विसरला नाही.(Kailash Kher was about to commit suicide in river ganga in rishikesh.).

कैलाश खेर आपल्या मुलाखतीत म्हणालाय,''मी जिवंत राहण्यासाठी खूप अजब गोष्टी केल्यात. मी २०-२१ वर्षांचा होतो तेव्हा मी दिल्ली मध्ये एक्सपोर्टचा बिझनेस सुरु केला. मी जर्मनीला हॅंडीक्राफ्ट निर्यात करायचो. माझं दुर्भाग्य की अचानक माझा तो बिझनेस बंद पडला''.

''बिझनेसमध्ये अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर मी पंडित बनण्यासाठी ऋषिकेशला गेलो. पण तिथे गेल्यावर मला वाटलं या कामासाठी मी योग्य नाहीय कारण तिथले माझे सहकारी माझ्यापेक्षा वयानं छोटे होते त्यामुळे आमच्या विचार करण्याच्या पद्धतील जमीन-आस्मानाचा फरक होता''.

'' मला नैराश्य आलं होतं कारण जे काम करत होतो त्यात अपयशच वाट्याला येत होतं.त्यामुळे एके दिवशी मी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला''.

''पण त्यावेळी घाटावर एक माणूस पटकन आला आणि त्यानं देखील माझ्या मागून नदीत उडी मारली आणि मला वाचवलं. त्यानं विचारलं, 'तुला पोहता येत नाही तर का उडी मारलीस?' तेव्हा मी उत्तर दिलं की, मरण्यासाठी''.

''आणि माझा आत्महत्येचा विचार ऐकून त्यानं माझ्या डोक्यात जोरात मारलं. या घटनेनंतर आपण एक दिवस स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि आपल्या अस्तित्वाचा विचार करत राहिलो. तो पूर्ण दिवस मी देवाशी बोललो'', असं देखील कैलाश खेर म्हणाला.

जेव्हा आपण २० व्या दशकात काही तरी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि अपयश येत होतं तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता. तेव्हा आपण ऋषिकेशमध्ये पुजारी बनण्यासाठी गेलो होतो असं कैलाश खेर म्हणाला.

''मी जेव्हा मुंबईत आलो होतो तेव्हा ३० वर्षांचा होतो,आयुष्याचा अनुभव जवळून घेतला होता. पण जेव्हा मी २० व्या दशकात नव्यानं काही तरी करु पाहत होतो तेव्हा अपयशच पदरी पडलं होतं आणि त्यामुळे डिप्रेशनशी माझी झुंज सुरू होती आणि म्हणूनच आत्महत्येसारखा भ्याड प्रकार माझ्याकडून घडला होता''.

कैलाश खेर पुढे म्हणाला, ''मी जेव्हा २१-२२ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मनात भावना होती की मी जगासाठी बेकार आहे,काही कामाचा नाही. मला या प्लास्टिकच्या भावनाशून्य जगात जन्मच घ्यायला नको हवा होता''.

'' त्यावेळी मी असाचा काहीतरी नकारात्मक विचार करायचो. आणि मग मारली उडी गंगा नदीत..मला एका माणसानं आत्महत्या करताना वाचवलं म्हणून..तो एक चमत्कार होता. पण तेव्हा देखील काही क्षण हा विचार मनात आला की बघा मी किती बेकार आहे..जीव देतानाही अपयशच वाट्याला आलं''.

''पण जेव्हा खोलीत स्वतःला बंद करुन स्वतःच्या अस्तित्वाचा विचार केला तेव्हा मी स्वतः स्वतःला सापडलो...नाहीतर हरवून गेलो असतो...त्या नकारात्मक विचारांच्या गर्दीत..''

कैलाश पुढे म्हणाला,''माझा विश्वास आहे की ती गंगा माताच असणार जी मला स्वतःपासून लांब ढकलू पाहत होती..आणि समुद्राजवळ म्हणजे माझ्या वडीलांजवळ मला पाठवू पाहत होती..म्हणूनच तर पुढे मुंबईत समुद्र किनारी माझं घर वसवलं''.

''आत्महत्येचे विचार तेव्हा येणं बंद झालं, जेव्हा मी बेकार आहे हा माझ्या मनातला विचार पुसून टाकला आणि कामावर लक्ष केंद्रित केलं''.

कैलाश खेरनं 'तेरी दिवानी','सईयां','चांद सिफारिश','यूं ही चला चल राही', 'या रब्बा..' आणि 'अर्जिया' अशी कितीतरी हिट गाणी गायली आहेत.