
अंदाज, हीर रांझा, रुप की रानी चोरों का राजा या चित्रपटांची नावे सांगितली. हे असे चित्रपट आहेत की जे मी पैशांसाठी साईन केले होते.
मुंबई - प्रख्यात अभिनेता अनिल कपूर हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे. गेली तीन ते चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना निखळ आनंद देणा-या अनिल कपूर यांचे हिंदी चित्रपटांना असलेलं योगदान मोठं आहे. अखंड उत्साह, उर्जा यामुळे अद्यापही त्यांच्या फॉलोअर्समध्ये घट झालेली नाही. यशस्वी कलावंत म्हणून ओळखल्या गेलेल्या अनिल कपूर यांना सुरुवातीच्या काळात मोठ्या खडतर परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे.
सध्या अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचा अभिनय असलेला ‘Ak Vs Ak’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी एका आगळ्या वेगळ्या विषयाला हात घालणारा चित्रपट असे म्हणून त्याचे कौतूक केले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांवर मुलाखती देण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर हे दोघेही चर्चेत आले आहे. मात्र अनिल कपूर हे त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या अनुभव कथनामुळे अधिक व्हायरल होत आहे.
अनिल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, माझ्या करिअरच्या सुरुवातीला माझ्यापुढे मोठ्या आर्थिक समस्या होत्या. तो काळ मोठा बाका होता. अनेक अडचणीही होत्या. त्यामुळे मला जिथे काम मिळेल ते मी केले. पैशांसाठी मी कुठलेही सिनेमे साईन केले होते. माझ्यापुढे त्यावेळी कुठलाही पर्याय नव्हता. मी फक्त पैशांसाठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि मी त्या चित्रपटांची नावे पण तुम्हाला सांगु शकतो. यावेळी अनिल यांनी अंदाज, हीर रांझा, रुप की रानी चोरों का राजा या चित्रपटांची नावे सांगितली. हे असे चित्रपट आहेत की जे मी पैशांसाठी साईन केले होते. त्यावेळी मला पैशांची गरज होती. त्यावेळी काही करुन पैसे कमवायचे होते.
आगामी रोमँटिक-कॉमेडी सिनेमात 'हे' दोन कलाकार साकारणार रणबीर कपूरच्या आई-वडिलांची भूमिका
यापुढे अनिल यांनी सांगितले की, मी आणि माझे कुटूंब फार नशीबवान आहे की आता तो वेळ फार मागे गेला आहे. आता आमच्यासमोर तशी परिस्थिती राहिलेली नाही. मात्र यापुढील काळातही जर काही समस्या आली तर मी पुन्हा कष्ट करण्यास कचरणार नसल्याचेही अनिल यांनी सांगितले.