ऑलिम्पिकची तयारी सुरुयं? 64 वर्षांच्या 'मजनूभाईला' चाहत्यांचा प्रश्न

क्रीडा क्षेत्रातील सर्वांत मोठी स्पर्धा थोड्याच दिवसांत सुरु होणार आहे.
anil kapoor
anil kapoor

मुंबई - क्रीडा क्षेत्रातील सर्वांत मोठी स्पर्धा थोड्याच दिवसांत सुरु होणार आहे. अशा ऑलम्पिक स्पर्धेची (tokio olympic 2020) वातावरण निर्मिती मनोरंजन क्षेत्रात मोठ्या उत्साहानं होत असल्याचे दिसुन आले आहे. जपानमधील टोकियोमध्ये ऑलम्पिक 2020 ला सुरुवात होणार आहे. आपल्या देशातील खेळाडू मोठ्या तयारीनिशी या स्पर्धेसाठी तयार झाले आहे. त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या यानिमित्तानं बॉलीवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. (anil kapoor run track at the age of 64 fans said preparing to go to the olympics yst88)

सोशल मीडियावर बॉलीवूडचे मजनूभाई अर्थात सर्वांचे लाडके अभिनेते अनिल कपूर (anil kapoor) अॅक्टिव्ह असल्याचे दिसुन आले आहे. त्यांनी वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र या वयातही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. ते नेहमी त्यांच्या वर्कआऊटचे व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. त्यांच्या या व्हिडिओ चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. अनेकजण त्यांना लाईक्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट देतात.

आता अनिल कपूर यांनी आपल्या रनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यावेळी त्यांना काही चाहत्यांनी काही गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका कमेंटन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, तुमची ऑलम्पिकची तयारी सुरु आहे का, त्या प्रतिक्रियेला अनेकांनी लाईकही केलं आहे. अनिल कपूर यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

anil kapoor
Gadar 2: तारा सिंग पुन्हा जाणार पाकिस्तानात पण या वेळी सकिनासाठी नाही तर...

त्या व्हिडिओमध्ये अनिलजी धावताना दिसत आहे. त्यांना त्यांचा ट्रेनर मोटिव्हेट करताना दिसत आहे. अनिल यांनी हा व्हिडिओ शेयर करताना त्याला एक कॅप्शनही दिली आहे. त्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, अॅक्शनमध्ये धावणे, आणि आता पुन्हा एकदा ट्रॅकवर धावणे यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com