Gadar 2: तारा सिंग पुन्हा जाणार पाकिस्तानात पण या वेळी सकिनासाठी नाही तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gadar movie

Gadar 2: तारा सिंग पुन्हा जाणार पाकिस्तानात पण या वेळी सकिनासाठी नाही तर...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (sunny deol) 'गदर: एक प्रेम कथा' या सुपर हि़ट चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये तारा सिंग ही प्रमुख भूमिका सनी देओलने साकारली होती. तारा सिंगची पत्नी सकिनाची भूमिका अमीषा पटेल (Ameesha Patel) ने साकारली. तारा सिंग आणि साकिना या दोन वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या या जोडीच्या प्रेमकथेवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. या दोघांचा मुलगा चरणजीतची भूमिका उत्कर्ष शर्माने साकारली. यासर्व कलाकरांच्या अभिनायाने प्रेक्षकांच्या मनातं विशेष स्थान मिळवले होते. चित्रपटातील गाणी आणि फाइट सिन हे त्यावेळी आयकॉनिक ठरले. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात.(sunny deol film gadar 2 will release soon)

'पिंकविला' च्या रिपोर्टनुसार गदर चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गदर 2' मध्ये तारा सिंग हा पत्नी सकिनासाठी नाही तर आपल्या मुलासाठी पाकिस्तानामध्ये जाणार आहे. एक महिन्यापूर्वी गदरच्या पहिल्या भागाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली. तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक अमिल शर्माने 'गदर' च्या सिक्वेलबाबत खुलासा केला नव्हाता पण तेव्हा ते म्हणाले होते की, ' मला 'गदर-2' दिग्दर्शित करायला नक्कीच आवडेल'. अशी चर्चा आहे की, 'गदर-2' मध्ये चित्रपटाच्या पहिल्या भागातीलच कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच दिग्दर्शक अनिल शर्मा हे लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहितील.

'गदर- 2' या चित्रपटावर काम करण्यापुर्वी अनिल शर्मा हे अपने-2 या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओल हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.