esakal | अनिल कपूर लॉकडाऊनमध्ये करतायेत त्यांच्या आगामी सिनेमाची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

anil kapoor

सर्व कलाकार लॉकडाऊनमध्ये नवीन गोष्टी शिकत असताना अभिनेते अनिल कपूर काही वेगळ्याच गोष्टीत अडकले आहेत. ते सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत आणि त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत.

अनिल कपूर लॉकडाऊनमध्ये करतायेत त्यांच्या आगामी सिनेमाची तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. सगळेच लोक घरीच थांबून सोशल डिस्टंन्सिंग पाळत आहेत. देशातील दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशातील कोरोना विषाणूचं संकट दूर करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, पोलिस हे आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत.  चित्रीकरण बंद असल्याने या क्वारंटाईन दिवसात कलाकार ही नवनवीन गोष्टी करत स्वतःच मनोरंजन करत आहेत. कोणी भांडी घासत, कोणी वर्कआऊट करत आहे तर कोणी आपल्या कुटुंबासोबत मौल्यवान वेळ घालवत आहेत. सर्व कलाकार नवीन गोष्टी शिकत असताना अभिनेते अनिल कपूर काही वेगळ्याच गोष्टीत अडकले आहेत. ते सध्या त्याच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहेत आणि त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांची याची माहिती दिली.

हे ही वाचा: लॉकडाऊननंतर पाखर लघुपटाचं हॉलीवूडमध्ये होणार स्क्रिनिंग.. सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद 

अनिल सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाचा रिसर्च करत आहेत. यासंदर्भात ते फोनवर मीटिंग देखील करत आहेत. ते म्हणाले, 'मी या क्वारंटाईन दिवसांचा फायदा करून घेते आहे. सध्या मी माझ्या पुढील चित्रपटाचा रिसर्च करण्यात व्यस्त आहे. यासाठी मी फोनवरच मीटींग्ज करत आहे. आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलणं करत आहे.'याशिवाय या लॉकडाऊनमध्ये अनिल त्यांच्या फिटनेसवरही लक्ष देत आहेत.

६३ वर्षीय अनिल कपूर लॉकडाऊनमध्येही त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. याबाबत अनिल म्हणाले की, ' सध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक्सरसाईज आणि फिटनेसच महत्व वाढलं आहे. सध्याच्या काळात आपल्याला शरारिकदृष्टया आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्याची गरज आहे. माझ्या मते प्रत्येकाने दिवसभरात अर्धा तास तरी व्यायाम करायला हवा. मग ते त्यांनी कोणतीही एक्सरसाईज केली तरी चालेल. आपल्या शरीराने हालचाल करणं फार गरजेचं आहे.' 

अनिल कपूर लवकर 'तख्त' या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांची महत्वाची भूमिका आहे.. लॉकडाऊनमध्ये ते या चित्रपटातील भूमिकेची ट्रेनिंग देखील घेत आहेत.  

anil kapoor talks about positive changes and work life after coronavirus lockdown