esakal | अनिल कपूर आणि अनुराग कश्यपची एअर फोर्सनं केली कानउघाडणी

बोलून बातमी शोधा

Anil Kapoor wears IAF uniform inaccurately AK vs AK IAF objects}

प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अनिल कपूर यांच्या ‘AK vs AK’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृश्यांविषयी सोशल मीडियामध्ये वाद सुरु झाला आहे.

अनिल कपूर आणि अनुराग कश्यपची एअर फोर्सनं केली कानउघाडणी
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकदा काही गोष्टी चूकीच्या दाखविल्या जातात. त्याचा प्रत्यय कित्येक चित्रपट आणि वेबमालिका यांच्या निमित्तानं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेबमालिकेवरील कंटेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. मात्र सध्याच्या काही मालिका आणि चित्रपटात दाखविण्यात येणा-या दृश्यांबाबत टीका होत आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता अनिल कपूर यांच्या ‘AK vs AK’ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या दृश्यांविषयी सोशल मीडियामध्ये वाद सुरु झाला आहे. त्यावर एअर फोर्सनं या दोघांची कानउघाडणी केली आहे. तसेच त्यांना ते दृश्य हटविण्यास सांगितले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘AK vs AK’ च्या ट्रेलरमध्ये भारतीय वायुसेनेचा जो पोशाख आहे तो त्याला चूकीच्या पध्दतीनं दाखविण्यात आले आहे.

AK vs AK’ या आगामी चित्रपटात अनिल कपूर वायु सेनेतील एकाअधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांमध्ये ते वायु सेनेचा पोशाखात वादग्रस्त भाषेत बोलत आहेत. त्यांचं बोलणं वायु सेनेला खटकलं आहे. त्यावर त्यांनी ट्विटरद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

वायु सेनेंन असे म्हटले आहे की, एके या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे काही दाखविण्यात  आले आहे ते चूकीचे आहे. त्यातून भारतीय वायु सेनेचा अपमान झाला आहे. वायुसेनेच्या गणवेशाला चूकीच्या पध्दतीनं मांडण्यात आले आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश लोकांमध्ये जात आहे. त्याबाबत दिग्दर्शकांनी काळजी घ्यायला हवी. त्यामुळे ते दृश्य चित्रपटातून काढून टाकावे. अशा शब्दांत वायु सेनेनं कानउघाडणी केली आहे.

2020 ची सर्वाधिक लोकप्रिय मालिका; 'स्कॅम 1922' आयएमडीचं रेटींग '9.5'

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा एक नवा चित्रपट येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव AK vs AK असं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं केलं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र या ट्रेलरवर भारतीय वायू सेनेने नाराजी व्यक्त केली आहे.