esakal | सोनमला निर्लज्ज म्हणणाऱ्याला अनिल कपूर यांचं विनम्रतेने उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

anil kapoor, sonam kapoor

सोनमला निर्लज्ज म्हणणाऱ्याला अनिल कपूर यांचं विनम्रतेने उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतंच अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यात अनिल कपूर हे ट्रोलर्सना उत्तर देताना दिसत आहेत. अरबाजने सोशल मीडियावरील काही कमेंट्स अनिल कपूर यांना दाखवले होते. त्यातील एका कमेंटमध्ये अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा ट्रोलरसने 'निर्लज्ज' असं म्हटलं होतं. या कमेंटवर अनिल कपूर यांनी अत्यंत विनम्रतेने उत्तर दिलं.

'बाबा आणि मुलगी दोघंही निर्लज आहेत. पैशांसाठी ते काहीही करू शकतात', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती. या नकारात्मक कमेंटवर अनिल कपूर यांनी शांतपणे उत्तर दिलं. 'त्यांनी अशी कमेंट केली असेल तर कदाचित ते चांगल्या मूडमध्ये नसतील किंवा आयुष्यात ते दु:खी असतील', असं ते म्हणाले. सोनम कपूर ही अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांची मोठी मुलगी आहे. अनिल आणि सुनिता यांना रिया आणि हर्षवर्धन ही दोन मुलंसुद्धा आहेत.

हेही वाचा: मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

हेही वाचा: 'सैराट'मधला परश्या की कबीर सिंग? नव्या लूकवर चाहते फिदा

आनंद अहुजाशी लग्न केल्यानंतर सोनम लंडनला राहायला गेली. शूटिंगनिमित्त किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती भारतात परतते. कुटुंबीयांपासून सोनम लांब राहण्याबाबत अनिल कपूर 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, "इतर पालकांप्रमाणेच, मला आणि सुनितालासुद्धा सोनमची खूप आठवण येते. तिच्याबद्दल आम्हाला कायम काळजी वाटत असते. पण सुदैवाने सध्याच्या काळात आपण मुलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलू शकतो. हा आम्हाला मोठा दिलासा आहे." बहीण रियाच्या लग्नासाठी सोनम नुकतीच मुंबईला आली होती. यावेळी अनिल कपूर तिला घ्यायला विमानतळावर गेले होते. वडिलांना पाहून सोनमला विमानतळावर अश्रू अनावर झाले होते.

loading image
go to top