esakal | मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत बबिता आणि टप्पू यांच्या भूमिका साकारणारे कलाकार मुनमुन दत्ता Munmun Dutta आणि राज अनाडकत Raj Anadkat हे खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर अखेर दोन्ही कलाकारांनी मौन सोडलं आहे. 'अफेअरच्या चर्चा या केवळ माध्यमांनी शिजवलेल्या कथा असून माझ्या संमतीशिवाय ते पसरवले जात आहेत,' असं राजने सोशल मीडियावर स्पष्ट केलं. तर मुनमुननेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित अफेअरच्या चर्चा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाला राज?

'अफेअरच्या चर्चा या केवळ माध्यमांनी शिजवलेल्या कथा असून माझ्या संमतीशिवाय ते पसरवले जात आहेत. अशा खोट्या चर्चांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकेल याचा थोडा तरी विचार करा. जे कोणी क्रिएटिव्ह लोकं या अफवा पसरवत आहेत, त्यांनी स्वत:ची कल्पकता कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी वापरावी. त्याने किमान तुम्हाला फायदा तरी होईल. देव त्यांना सदबुद्धी देवो, अशी प्रार्थना मी करतो,' असं राज इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाला.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

मुनमुनचं उत्तर-

'मला तुमच्याकडून अधिक चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती. मात्र, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जी घाण पसरवली आहे, त्यातून हे सिद्ध होतंय की, आपण तथाकथित 'सुशिक्षित' असूनही समाजाला मागे घेऊन जाणारा भाग आहोत. तुमच्या या मजेमुळे एखाद्यावर काय ओढवतं, आणि त्याच्यावर काय परिणाम होतात, याची आपल्याला कधीच चिंता वाटली नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. मात्र, लोकांना मला दुखवायला 13 मिनिटं देखील लागले नाहीत. पुढच्या वेळी तुमचे शब्द वापरताना हा विचार जरुर करा की, कुणी इतकं नैराश्यात जाऊन आत्महत्त्या करण्याचा विचार करेल का? आज मला स्वत:ला भारताची मुलगी म्हणवताना लाज वाटतेय,' अशा शब्दांत मुनमुनने तिच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

loading image
go to top