अनिल कपूर यांचे स्वप्न या दिग्दर्शकामुळे पूर्ण झाले नाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

अनिल कपूर यांनी नोलनने दिलेल्या त्या नकाराचा किस्सा सांगितला. तो किस्सा असा आहे “मला आजही चांगले आठवत आहे. तेव्हा मी ‘इनसेप्शन’च्या ऑडिशनसाठी तुमच्याकडे आलो होतो.

मुंबई : अभिनेता अनिल कपूरने आतापर्यत विविध भूमिका साकारल्या आहेत.मोठमोठ्या तसेच नवोदित दिग्दर्शकांबरोबर आणि अभनेत्रीबरोबर त्याने काम केले आहे.आजही तितक्याच उत्साहाने आणि नव्या उमेदीने तो काम करीत असतो. आजही तो तितकाच फिट आणि फाईन राहिला आहे.

नेहमीच काही ना काही किस्से किंवा गोष्टी सांगून ते जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. जुन्या आठवणींचा जणू काही खजिनाच त्यांच्या जवळ आहे. आताही त्यांना आपला एक जुना किस्सा सांगितला आणि त्यांचे चाहते तो किस्सा ऐकून अचंबित झाले. त्याचे असे झाले की अनिल कपूर यांनी ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि या ट्रेलरसोबतच त्यांनी तो अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे.

ख्रिस्तोफर नोलन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. या तरबेज दिग्दर्शकासोबत काम करणं हे अनिल कपूर यांचं स्वप्न होतं.. परंतु त्यांच्या या स्वप्नावर स्वत: नोलनेच पाणी फिरवलं होतं. अनिल कपूर यांनी नोलनने दिलेल्या त्या नकाराचा किस्सा सांगितला. तो किस्सा असा आहे  “मला आजही चांगले आठवत आहे. तेव्हा मी ‘इनसेप्शन’च्या ऑडिशनसाठी तुमच्याकडे आलो होतो.

हेही वाचा :  बोनी कपूरच्या घरातील आणखीन दोन नोकर पाॅझिटिव्ह

तुम्ही माझी आॅडिशन्स घेतलीत खरी. पण त्यामध्ये मी रिजेक्ट झालो. परंतु मी हार मानली नाही. ‘बॅटमॅन’च्या डीव्हीडीवर तुमचा ऑटोग्राफ घेऊनच घरी परतलो. ‘टेनेट’ चित्रपटाला माझ्या शुभेच्छा आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे घेऊन येईल अशी मला खात्री आहे.” अशा आशयाचे ट्विट अनिल कपूर यांनी केलं आहे. ‘इनसेप्शन’ हा एक सुपरहिट चित्रपट होता. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल चार ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले होते.

अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ याने चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाची पटकथा माणसाची स्वप्न आणि त्यामधील विचार यांच्यावर आधारित होती. या चित्रपटात काम करण्याची अनिल कपूर यांची इच्छा होती. परंतु ती इचछा पूर्ण झाली नाही आणि त्यावेळचा तो किस्सा अनिल कपूर यांनी सांगितला व पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kapoor's dream did not come true because of this director