esakal | टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवेला कोरोना; आयसीयूमध्ये दाखल

बोलून बातमी शोधा

Aniruddh Dave

टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवेला कोरोना; आयसीयूमध्ये दाखल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'पटियाला बेब्स', 'लॉकडाउन की लव्ह स्टोरी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारणारा अभिनेता अनिरुद्ध दवेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता त्याला अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आलं आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री आस्था चौधरीने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित याबद्दची माहिती दिली. त्याचसोबत अनिरुद्धच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन तिने चाहत्यांना केलंय. 'मित्र अनिरुद्ध दवेच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कृपया एक मिनिट वेळ काढा आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा', असं तिने लिहिलं.

भोपाळमध्ये एका वेब सीरिजच्या शूटिंगसाठी गेला असता त्याला कोरोनाची लागण झाली. "भोपाळमध्येच त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र नुकत्याच केलेल्या चाचण्यांनुसार त्याच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे", अशी माहिती अनिरुद्धचा मित्र अजय सिंह चौधरीने एका मुलाखतीत दिली.

img

गेल्या आठवड्यात अनिरुद्धने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. 'तुझी भेट न होवो यासाठी खूप प्रयत्न केले, पण म्हणतात ना, बकरीची आई कधीपर्यंत खूश राहील? बाहेर पडल्यावर शिकार होणारच आहे. यावेळी हे खूप धोकादायक आहे. कोरोनाचा हल्ला कोणावरही कधीही होऊ शकतो. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्या, काळजी घ्या', अशी पोस्ट त्याने लिहिली होती.