'bride to be' : लग्नाआधीच अंकिता लोखंडेवर होतोय गिफ्ट्सचा वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंकिता बॉयफ्रेंड विकी जैनसोबत

लग्नाआधीच अंकिता लोखंडेवर होतोय गिफ्ट्सचा वर्षाव

अंकिता लोखंडे आणि बिझनेसमन विकी जैन गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. नेहमीच ते सोशल मिडियावर त्यांचे एकत्र फोटोज किंवा व्हिडिओज पोस्ट करून एकमेकांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करीत असतात. त्यामुळे अर्थातच ते लग्न कधी करणार असा प्रश्नही चाहत्यांच्या मनात घर करून राहिला होता. पण काही दिवसांपूर्वी ते दोघे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लग्न करणार असल्याची बातमी आली आणि त्यानंतर मात्र अंकितावर शुभेच्छांसोबत गिफ्ट्सचाही वर्षाव होऊ लागला.

हेही वाचा: आई तू मला 'गंजा पटेल' हाक का मारतेस?

अंकिताला गिफ्ट म्हणून आलेल्या चप्पलवर 'ब्राईड टू बी' लिहिले आहे तर एका गिफ्टवर 'हॅप्पी ब्राईड' असे लिहिले आहे. अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या गिफ्ट्सची झलक चाहत्यांसाठी पोस्टच्या माध्यमातून दाखवली आहे. फोटोला कोणतंही कॅप्शन दिलं नसलं तरी हात जोडलेला इमोजी टाकून तिनं गिफ्ट्ससाठी धन्यवाद दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुढच्या महिन्यात लग्न करणार आहेत पण या बातमीला अद्यापतरी अंकिता किंवा विकीने दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा: ते प्री वेडिंग त्यांना आयुष्यभर राहिल लक्षात!

सुशांत सिंग राजपूत सोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे इंडस्ट्रीपासून दुरावली होती. पण त्याच दरम्यान तिच्या आयुष्यात विकी जैन आला आणि तिचं आयुष्य पुन्हा बदललं याची कबुली तिने नेहमीच दिलीय. मणिकर्णिका,बागी ३ अशा सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून तिनं आपला बॉलिवूड प्रवास सुरू केला. सध्या ती 'पवित्र रिश्ता २' मालिकेत काम करीत आहे. या मालिकेमध्येही तिच्या भूमिकेला पसंती मिळत आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top