सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता-विकीच्या नात्याचा असा होणार होता The End Ankita Lokhande | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ankita Lokhande, Vicky Jain, Sushant Singh Rajput

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता-विकीच्या नात्याचा असा होणार होता The End

छोट्या पडद्यावर अंकिता लोखंडेनं(Ankita Lokhande) आपला अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरू केला. एकता कपूर निर्मित 'पवित्र रिश्ता'(Pavitra Rishta) ही तिची आणि सुशांत सिंगची पहिलीच एकत्र काम केलेली मालिका. याच सेटवर ते पहिल्यांदा भेटले. त्यांच्यात प्रेम झालं.आणि मग पुढे जवळजवळ ते सहा वर्ष म्हणजे २०१० ते २०१६ रीलेशनशीपमध्ये होते. पण काही कारणानं त्यांच्यात वाद होऊ लागले,आणि लग्नापर्यंत पोहोचलेली त्यांची प्रेमाची गोष्ट ब्रेकअपवर थांबली. त्यानंतर सुशांत आपल्या आयुष्यात यश मिळवत पुढे निघून गेला पण अंकिता मात्र काही वर्ष आपल्या त्याच नात्याला कुरवाळत बसली. त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात विकी जैन आला अन् तिचं आयुष्य बदललं. तिनं सुशांतला विसरुन विकी सोबत आयुष्यात पुढे जायचा निर्णय घेतला.

अंकिता-विकीनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी तर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता. अंकिता नेहमीच सोशल मीडियावर आपल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी शेअर करताना दिसते. विकीसोबत अंकिता लग्नानंतर खूप खूश आहे याचे दाखलेच जणू ते फोटो-व्हिडीओ. आता 'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमात अंकितानं विकीसोबत सहभाग घेतला आहे. त्यावेळी आपल्या आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टींचा त्यांनी खुलासा केला आहे. सर्वात मोठा खुलासा केला आहे तो सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर काही दिवस त्यांच्या नात्यात आलेल्या तणावाला घेऊन. विकी जैनच पहिल्यांदा नॅशनल टेलीव्हिजनवर त्यांच्या नात्याला घेऊन बोलला आहे. काय म्हणाला आहे विकी जैन?

विकी म्हणाला,''सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता बदलली होती. तिनं त्याच्यासाठी,त्याला न्याय मिळवून देण्यासाठी,त्याच्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी केल्या. मी देखील तिला थांबवलं नाही. ती अचानक घडलेल्या त्या गोष्टीनं डळमळली होती आणि तिच्यासोबत आमचं नातंही. अनेकांनी माझ्या मनात तिच्याविषयी नको त्या गोष्टी पेरण्यास सुरुवात केली होती. पण मी तिला समजून घेतलं. तिची त्यावेळची अवस्था मला कळाली. तिला त्या गोष्टी करण्यात मनाला शांती मिळत होती.आणि माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं. मी सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे दूर्लक्ष करून तिला सपोर्ट करण्याचं ठरविलं. माझ्या मनातील अंकिता-सुशांतच्या नात्याला घेऊन असलेलं कन्फ्यूजनही दूर झालं''. अशाप्रकारे विकी जैन(Vicky Jain) पहिल्यांदाच अंकिता-सुशांतच्या नात्यावर पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोलला असेल.