esakal | अंकुश चौधरीचं चाहत्यांना 'दुनियादारी' स्टाईलने आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

post

अंकुश चौधरीचं चाहत्यांना 'दुनियादारी' स्टाईलने आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने Ankush Chaudhary साकारलेली 'दुनियादारी' Duniyadari चित्रपटामधील दिग्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. या चित्रपटातील दिग्या आणि श्रेयसची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. श्रेयसची भूमिका अभिनेता स्वप्निल जोशीने Swwapnil Joshi साकारली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाले. चित्रपटातील अंकुशचा 'तेरी मेरी यारी..' हा डायलॉग प्रचंड गाजला. अंकुशने नुकतीच सोशल मीडियावर दुनियादार चित्रपटाची एक पोस्ट शेअर केली आहे. अंकुशने कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचे तसेच मास्कचा वापर करण्याचे हटक्या स्टाईलमध्ये आवाहन केले आहे. (ankush chaudhary has appealed poeple to wear mask in a unique way)

अंकुशने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 'दुनियादारी'मधील दिग्या आणि श्रेयसच्या भूमिकेचे कार्टुन दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दिग्या आणि श्रेयसने मास्क घातला आहे. या फोटोमध्ये लिहिले आहे 'तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू, मग करू दुनियादारी'. अंकुशच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. यावर स्वप्निल जोशीने कमेंट करत लिहिलं, 'दिग्या बोलला म्हणजे बोलला… '. अंकुशच्या या पोस्टला 18 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

हेही वाचा : 'एकवेळ देव शोधणं सोपं पण बेड मिळवणं कठीण'

अंकुश लवकरच 'लॉकडाउन' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील काम करणार आहे. अंकुश आणि प्राजक्ता या जोडीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे. दगडी चाळ, क्लासमेट, गुरू या चित्रपटांमधील अंकुशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

loading image
go to top