esakal | 'देव शोधणे सोपे पण बेड मिळवणे कठीण'; सोनू सूदने सांगितला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood

'एकवेळ देव शोधणं सोपं पण बेड मिळवणं कठीण'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रूग्णांना उपचारासाठी वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदलादेखील रूग्णांला बेड उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोनूने लॉकडाऊनमध्ये अनेक मजूरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी सोनूने हाती घेतलेल्या या मदत कार्याचे सर्वांनी कौतुक केले होते. सोनूने आता कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. पण त्याला एक बेड मिळवण्यासाठी तब्बल 11 तास वाट पहावी लागली आहे. हा अनुभव सोनूने ट्विट करून नेटकऱ्यांना सांगितला आहे.

सोनूने ट्विट केले, 'दिल्लीमध्ये यावेळेस देव शोधणे सोपे आहे पण बेड मिळवणे कठीण झाले आहे. पण शोधू.. फक्त हिंमत सोडू नका'. दुसऱ्या ट्विटमध्ये सोनूने सांगितले, 'दिल्लीमध्ये एका बेडची व्यवस्था करण्यासाठी मला 11 तास लागले आणि उत्तर प्रदेशात एक बेड उपलब्ध करून देण्यासाठी साडे नऊ तास लागले'. सोनूच्या या मदत कार्याचे सर्व जण कौतुक करत आहेत. पण त्याला कार्यात येणाऱ्या अडथळ्यांचा निषेध करत यासाठी यंत्रणा कारणीभूत असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 'वडिलांच्या निधनानंतर आईचं सांत्वनही करू शकले नाही'; हिना खानची हतबलता

हेही वाचा : 'निरोपही देता आला नाही'; अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचं कोरोनाने निधन

ऑक्सिजन बेड न मिळण्याबाबत सोनूने ट्विट करत सांगितले, 'आम्ही शेकडो ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण चीनने आमच्या अनेक कन्साइन्मेट्स रोखून धरल्या आहेत. हे दु;ख आहे. या कन्साइन्मेंट्स त्वरित क्लिअर करा. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आमची मदत करा.' या ट्विटमध्ये सोनूने चीनच्या दुतावासाला टॅग केले आहे. सोनूच्या या ट्विटला चीनी राजदूतने लगेच उत्तर दिले, ' कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात चीन भारताची पूर्ण मदत करण्यास कटिबध्द आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्व मालवाहतूक मार्ग पूर्ववत करण्यात येत आहेत.' सोनूच्या या ट्विची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

loading image
go to top