अभिनेता अंकुश चौधरीचा येतोय 'ट्रिपल सीट'

वृत्तसंस्था
Saturday, 24 August 2019

अभिनेता अंकुश चौधरीचा एक नवा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ट्रिपल सीट' असे या चित्रपटाचे नाव आहे. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : अभिनेता अंकुश चौधरीचा एक नवा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ट्रिपल सीट' असे या चित्रपटाचे नाव आहे. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संकेत प्रकाश पावसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

या चित्रपटाच्या पोस्टरवर मध्यभागी अंकुश चौधरी बासरी हातात धरलेला दिसत आहे. अंकुश श्रीकृष्णच्या पोझमध्ये दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत दोन्ही बाजूला दोन अभिनेत्री उभ्या असलेल्या दिसत आहेत. मात्र, त्या अभिनेत्री नेमक्या कोण आहेत. हे दिसत नाही. त्यामुळे याची उत्सुकता लागली आहे.

'ट्रिपल सीट' या चित्रपटाला 'वायरलेस प्रेमाची गोष्ट' अशी टॅगलाईनही देण्यात आली आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कथा घेऊन येत आहे. अविनाश-विश्वजित यांनी या चित्रपटाला संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. 

'ट्रिपल सीट'चे पोस्टर रिलिज झाल्याने या पोस्टरमध्ये असलेल्या त्या दोघी नक्की कोण आहेत? याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankush Choudhary New Marathi Movie Triple Seat release soon