Raju Srivastava: 'जिमला गेल्यामुळे...' , राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच मुलगी अंतरांचं वक्तव्य

राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय देखील या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अशा व्यक्तीला इतक्या सहजासहजी विसरता येत नाही.
Raju Srivastava
Raju SrivastavaSakal

आपण 2022 साली देशाचे ज्येष्ठ विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांना गमावले. या दुःखातून त्यांचे चाहते अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय देखील या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अशा व्यक्तीला इतक्या सहजासहजी विसरता येत नाही, राजू यांची मुलगी अंतरा हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वडिलांबद्दल बोलली आणि त्या जिम प्रकरणाबद्दलही बोलली ज्यामध्ये लोकांनी दावा केला होता की जास्त वयात जिम केल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला.

दिलेल्या मुलाखतीत राजू श्रीवास्तवबद्दल बोलताना अंतराला विचारण्यात आले की ते जिम पर्सन होते, आणि जास्त व्यायाम करायचे का ? यावर उत्तर देताना अंतरा म्हणाली- होय, माझे वडील त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत खूप जागरूक होते. ते जवळजवळ अल्टरनेट डे जिमला जात असे. जेव्हा ते बाहेर जायचे तेव्हा ते कारमधून पाहायचे की त्यांना वाटेत कुठेतरी जिम मिळेल आणि ते वर्कआउट करू शकतील.

अंतरा पुढे म्हणाली की ते एक फिटनेस फ्रीक होते आणि जिम आणि व्यायामात जास्त रस न दाखवणाऱ्या आम्हा कुटुंबातील सदस्यांसाठीही ते प्रेरणास्रोत होते. त्यांच्यासोबत जे काही घडले ते फक्त एक अपघात होता. तो योगायोग होता. ते जीममध्ये असताना हा प्रकार घडला. पण केवळ यामुळे आपण जिमला दोष देऊ नये. त्यांची स्वतःची आरोग्य परिस्थिती होती.

Raju Srivastava
James Cameron On RRR : 'तुम्ही राव भारीच! जबरी गाणं...' अवतारच्या दिग्दर्शकानं केलं नाटू-नाटूचं कौतूक, जर हे...

राजू श्रीवास्तव यांचा जिम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 59 वर्षांचे होते. अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना दु:ख झाले. जे सगळ्यांना हसवायचे ते निघून गेले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कानपूर येथील घरी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉमेडियनची सर्वत्र आठवण झाली आणि लोकांनी आपापल्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com