esakal | सलमानचं 'विघ्नहर्ता' झालं रिलीज, अजय-अतुलचा नाद नाय!
sakal

बोलून बातमी शोधा

सलमानचं 'विघ्नहर्ता' झालं रिलीज, अजय-अतुलचा नाद नाय!

सलमानचं 'विघ्नहर्ता' झालं रिलीज, अजय-अतुलचा नाद नाय!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी अंतिम द फायनल ट्रुथची उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना त्याविषयी कुतूहल होते. प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. आता 'विघ्नहर्ता' चा संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे. त्याला दर्शक आणि चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यामध्ये सलमानसह आयुष शर्मा आणि वरुण धवन आहेत. काही दिवसांपूर्वी अंतिम द फायनल ट्रुथचं पोस्टर अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याच्या टीझरचे अनावरण करण्यात आले आहे. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

टीजरला दर्शकांसाठी प्रदर्शित केल्यानंतर, याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या चाहत्यांकडून याचे भव्य स्वागत होताना दिसत आहे. या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या डान्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांसाठी ती आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे. ट्रॅकचा टोन आणि व्हिज्यूअल्स प्रभावी आहेत. यातील रंगसंगतीला कल्पकतेनं दर्शविण्यात आलं आहे. "अंतिम: द फाइनल ट्रुथ" सलमान खान फिल्म्सद्वारे प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा हे दोन अभिनेते एकमेकांसमोर उभे आहेत. त्यांच्याकडे पाहून ते युद्धाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघांच्या लूकचं मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. सलमानच्या अशाप्रकारच्या लूकचं त्याचे चाहते नेहमीच उत्साहानं स्वागत करत असल्याचे पाहायला मिळते. पोस्टरचे डिजाइन लक्षवेधी आहे. त्यात दोन प्रमुख व्यक्तिरेखांचा संघर्ष दिसून येतो.

loading image
go to top