Anup Jalota Birthday: भजन सम्राट शिष्येच्याच प्रेमात पडले!|Anup Jalota Happy Birthday Stroy love story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anup Jalota Birthday

Anup Jalota Birthday: भजन सम्राट शिष्येच्याच प्रेमात पडले!

Anup Jalota Story: भजन सम्राट म्हणून ज्यांना साऱ्या देशात ओळखलं जातं त्या अनुप जलोटा यांची प्रेमकहाणी नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय (Entertainment News) असते. सहा भाषांमध्ये तब्बल बाराशेहून अधिक भजन गाणाऱे अनुप जलोटा हे त्यांच्या हटक्या स्टाईलसाठी देखील ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत त्यांनी आयुष्यातील काही रंजक प्रसंगांना नेहमीच उजाळा दिला आहे. काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा (Kapil Sharma Show) शोमध्ये आलेल्या जलोटा यांनी भन्नाट किस्से सांगून प्रेक्षकांना अवाक केले होते.

आज अनुप जलोटा यांचा जन्मदिन आहे. संगीत क्षेत्रामध्ये आपल्या बहादरदार गायकीनं जलोटा यांनी नेहमीच चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. (Bollywood News) अनेकदा त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. आज जलोटा हे 70 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. केवळ भजनच नाहीतर सुगम संगीत, गझल गात त्यांनी चाहत्यांना स्वरानंद दिला आहे. जलोटा यांनी वडील पुरुषोत्तम दास जलोटा यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. लहान (Bollywood Singer) वयापासून गाण्याची आवड असणाऱ्या जलोटांनी आपली आवड प्रयत्नपूर्वक जोपासली.

नैनीताल येथे जन्म झालेल्या जलोटा यांचे बालपण एका शास्त्रीय संगीताचा वारसा जपणाऱ्या कुटूंबात गेले. त्यांचे वडील हे लोकप्रिय भजन गायक होते. सहा भाषांमध्ये बाराशे हून अधिक भजन आणि गझल गाणाऱ्या जलोटा यांचे 150 हून अधिक अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर देखील नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या जलोटांनी इंस्टावरुन देखील चाहत्यांना जिंकून घेतले आहे. जलोटा यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो.

हेही वाचा: Ananya Pandey आणि विजय देवरकोंडाचा मुंबईच्या लोकलमधून प्रवास, Video Viral

प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांना जलोटांचा आवाज इतका भावला होता की त्यांनी आपल्या शिर्डी के साई बाबा चित्रपटातून त्यांना गाण्याची संधी दिली. ते गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. जलोटा हे काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. बिग बॉसच्या बाराव्या सीझनमध्ये आलेल्या जलोटा यांचे नाव हे तीस वर्षांच्या जसलीन मथारुशी जोडले गेले होते. जसलीननं सांगितलं होतं की, ती जलोटा यांची गर्लफ्रेंड आहे. ती जलोटा यांची शिष्या असल्याचे सांगितले जाते. ती त्यांच्याकडून संगीताचे धडे घेत होती.

हेही वाचा: Video: दगडूच्या प्रेमाला पुन्हा फुटणार 'पालवी'

Web Title: Anup Jalota Happy Birthday Stroy Love Story With Student Bigg Boss Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..