One Day Trailer : 'प्रत्येक गुन्ह्यामागे एक गोष्ट असते...'; ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 May 2019

'वन डे' चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्ता क्राइम ब्रांचची स्पेशल ऑफिसरची भूमिका करत आहे.

अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांचा आगामी चित्रपट 'वन डे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडींगमध्ये आहे. या चित्रपटात खेर आणि ईशा सह अभिनेता कुमुद मिश्रा यांची देखील मुख्य भूमिका आहे. 

'वन डे' चा दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये थ्रिलर, क्राइम आणि रहस्य भरभरून आहे. ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे चित्रपटात अनुपम खेर हे सेवानिवृत्त न्यायाधीशच्या भूमिकेत आहेत तर ईशा गुप्ता क्राइम ब्रांचची स्पेशल ऑफिसरची भूमिका करत आहे. कुमुद मिश्रा हे प्रामाणिक पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतील. ट्रेलरमध्ये ईशा गुप्ताची दमदार एंट्री मन जिंकून घेते. 

एका गुंतलेल्या गुन्ह्याच्या गोष्टीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक नंदा यांनी केले आहे. ट्रेलरमध्ये बॉम्बस्फोटाचा सीन दाखविण्यात आला आहे. अनुपम खेर यांची भूमिका रहस्यमय दाखविली आहे. पोलिसांना ही गुन्ह्याची गोष्ट सोडविणे जड होऊन बसतं आणि पोलिसांच्या मदतीसाठी क्राइम ब्रांचच्या स्पेशल ऑफिसरला बोलावलं जातं. हा चित्रपट 9 जूनला प्रदर्शित होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anupam Kher and Isha Gupta Starer One Day Trailer release