Anupam Kher Birthday : 'मार्चमध्ये जन्माला येणारी सगळी लोकं....' अनुपम खेर यांच्या व्हिडिओवर कंगना बोललीच!

अनुमप खेर (Anupam Kher Birthday) यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शेयर केलेल्या त्या व्हिडिओवरील कंगनाची कमेंट गमतीशीर आहे.
Anupam Kher Birthday Video
Anupam Kher Birthday Videoesakal

Anupam Kher Viral Video : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनुपम खेर यांच्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक व्हर्सेटाईल अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव घ्यावं (Latest Bollywood News) लागेल. उद्या (७ मार्च) त्यांचा जन्मदिवस आहे. त्या निमित्तानं त्यांनीच एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यावर कंगनानं (Kangana Comment) दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

अनुमप खेर यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं दरवर्षी ते वेगवेगळे संकल्प करत असतात. यंदाच्या जन्मदिनाच्या औचित्यानं त्यांनी काही (Anupam Kher birthday) संकल्प केला आहे. त्याविषयी त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कंगनानं त्या व्हिडिओवर कमेंट केली आणि त्याची चर्चा झाल्याचे दिसून आले आहे. अनुमप खेर यांच्याविषयी सांगायचे झाल्यास वयाची साठी पार केल्यानंतर देखील त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

त्याचं झालं असं की, अभिनेते अनुपम खेर यांनी स्वत: इंस्टावर तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दरवर्षी प्रमाणे या वर्षी मी जन्मदिनाच्या निमित्तानं एक वेगळा संकल्प केला आहे. काही नवीन करायचं हे धोरण मी स्विकारलं आहे. मला माहिती आहे की, तो प्रवास खूपच सुंदर असेल. त्यातून मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील.

अनुपम यांनी असं देखील म्हटलं आहे की, मी काय संकल्प करणार आहे हे तुम्हाला उद्या नक्कीच सांगेन. त्या व्हिडिओवर कंगनानं जी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापूर्वी कंगनानं अनंत अन् राधिका यांच्या प्री वेडिंगच्या निमित्तानं शेयर केलेली पोस्ट ही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय होती. आपण कधीही कुणाच्या लग्नात नाचलो नाही. असे म्हणत तिनं आपला राग व्यक्त केला होता.

Kangana Post
Kangana Post
Anupam Kher Birthday Video
Emraan Hashmi : 'अभिनेत्री म्हणून कंगना आवडते पण...' गँगस्टर चित्रपटावरून इम्रान हाश्मी काय बोलून गेला?

कंगनाच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटस भन्नाट आहेत. धाकड फेम कंगनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की सगळे सेक्सी लोकं ही मार्चमध्ये जन्माला येतात... कंगनानं अशा शब्दांत अनुपम खेर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं केलेली कमेंट ही नेटकऱ्यांच्या खास कमेंट्सचा विषय आहे. अर्थात कंगनानं गमतीत अशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्याचे तिच्या इमोजीवरुन दिसून येत आहे.

अनुपम खेर यांच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या कमेंटस केल्या आहेत. अनेकांनी कंगनाच्या बोलण्यावर सहमती दर्शवली आहे. कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा इमर्जन्सी नावाचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ज्यामुळे कंगना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com