Anupam Kher In Ayodhya: हनुमानगढ़ीसह 21 मंदिरांची ऐतिहासिक डॉक्युमेंटरी दाखवणार, अनुपम खेर अयोध्येत दाखल!

Anupam Kher In Ayodhya
Anupam Kher In AyodhyaEsakal

Anupam Kher In Ayodhya: बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. त्याच्या विनोदीच नव्हे तर गंभीर भुमिकाही प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

Anupam Kher In Ayodhya
Sunny Deol: सनी देओलने केलं मराठी सिनेमा आत्मपॅफ्लेटचं प्रमोशन, शेअर केली बालपणीची खास आठवण

सध्या विवेक अग्नीहोत्रीच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटातील भुमिकेने ते प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता अनुपम खेर अयोध्या हनुमानगढ़ीसह 21 हनुमान मंदिरांच्या पार्श्वभूमीशी संबंधित ऐतिहासिक डॉक्युमेंटरी तयार करणार आहेत. या संदर्भात, अनुपम हे शुक्रवारी रात्री अयोध्येला पोहोचले होते. सध्या सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

रामजन्मभूमी परिसराजवळील श्रीराम देवस्थान मंदिराचे त्यांनी दर्शन घेतले आणि पूजा केली. त्याचबरोबर तिथल्या संतांच्या भेटीही घेतल्या. संकटमोचन हनुमान यांची आठ मंदिरे आणि त्यांचे महत्त्व यावर आधारित डॉक्युमेंट्री फिल्म त्यांनी लाँच केली.

Anupam Kher In Ayodhya
Anushka-Virat Kohli: एकीकडे वर्ल्डकपचा उत्साह दुसरीकडे बाबा होण्याचा आनंद! अनुष्का - विराटच्या घरी गुडन्यूज?

यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईचे स्वप्न आहे की त्यांनी अयोध्येला येऊन श्रीरामाचे दर्शन घ्यावे. राम मंदिरात रामाची मुर्ती बसवल्यानंतर मला निमंत्रण मिळाले तर मी माझ्या आईसोबत दर्शनासाठी येईन, कारण तिची श्री रामाला पाहण्याची खूप इच्छा आहे. मी फक्त देवाकडे सुख आणि शांती मागतो, असेही ते म्हणाले.

देवाने मला सर्व काही दिले आहे. मी आज इथे काही मागायला नाही तर देवाचे आभार मानायला आलो आहे. इथल्या प्रत्येक दगडात तीर्थ आहे. असंही अनुपम म्हणाले.

Anupam Kher In Ayodhya
BO Collection Day 2: 'फुकरे 3' जोमात अन् नानांचा 'व्हॅक्सीन वॉर', कंगनाचा 'चंद्रमुखी 2' कोमात! दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर!

कश्मीर फाइल्सवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी येथे 21 हनुमान मंदिरांबद्दल बोलण्यासाठी आलो आहे आणि प्रश्न कश्मीर फाइल्सवर विचारण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटतं की कश्मीर फाइल्सने त्यांचे काम केले आहे. 370 हटवल्यानंतर काश्मीरच्या विविध भागात तिरंगा फडकताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com