Anupam Kher: अवॉर्ड्स माझ्याकडेही आहेत पण इथे तर.. पी व्ही सिंधूच घर पाहून अनुपम खेर थक्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher meets PV Sindhu at her home, is amazed by her trophies

Anupam Kher: अवॉर्ड्स माझ्याकडेही आहेत पण इथे तर.. पी व्ही सिंधूच घर पाहून अनुपम खेर थक्क

anupam kher: बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. कधी आईसोबत धमाल मस्ती करताना तर कधी कुटुंबासोबत सेलिब्रेशन करतानाचे व्हिडिओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसंच भटकंतीचे अनेक व्हिडिओ देखील ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नुकतीच अनुपम खेर यांनी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची तिच्या घरी भेट घेतली. यावेळी तिचं घर पाहून अनुपम खेर थक्क झाले. भेटीदरम्यानचा तिच्या घरातील एक व्हिडिओ अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलाय. (Anupam Kher meets PV Sindhu at her home, is amazed by her trophies)

व्हिडिओतून अनुपम खेर यांनी पी.व्ही. सिंधूच्या (p v sindhu)घराची सफर घडवली आहे. यात पी सिंधूने पटकावलेले सर्व चषक दिसत आहेत. या ट्रॉफी पाहून स्वतः अनुपम खेरदेखील थक्क झाले. या व्हिडिओत ते म्हणत आहेत "हे खूपच सुंदर आहे. ही भिंत तर पहा... मला कायम गर्व असायचा की माझ्या घरातील भिंतीवर खूप सारे अवॉर्ड्स आहेत. पण हे सगळं तर खूपच कमाल आहे. अरे बापरे म्हणजे तुम्ही पहा इथे तर अजिबातच जागा उरलेली नाही." तर पी.व्ही. सिंधूने वयाच्या आठव्या वर्षापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पटकाविलेले चषक अनुपम खेर यांना दाखवले.

अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मधून पी.व्ही सिंधूच कौतुक केलंय. त्यांनी लिहिलं, " खूपच सुंदर... नुकतच मला चॅम्पियन पी.व्ही. सिंधूच्या घराला भेट देण्याचं भाग्य लाभलं. अत्यंत नम्रपणे तिने ही सफर घडवली. तिचे पुरस्कार, ट्रॉफी आणि नम्रता पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो होतो! ती या देशाची लेक आहे, आमचा सन्मान आहे. ती प्रेरणा देणारी हिरो आहे."

तर सिंधूने देखील या भेटीदरम्यानचा अनुपम खेर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. "चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारासोबत गप्पा मारता आल्या वेळ घालवता आला. हे माझं भाग्य आहे." असं कॅप्शन देत तिने आनंद व्यक्त केला आहे. पी.व्ही. सिंधूने दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावत देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली आहे. 2016 च्या रिओ स्पर्धांमध्ये रौप्य तर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर तिने तिचं नाव कोरलं आहे.