अभिनेता कुणाल खेमु भडकला, म्हणाला 'सामना करण्यासाठी मैदान एकसारखं तर द्या'

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

७ बडे सिनेमे ऑनलाईन रिलीज करण्याची घोषणा डिस्ने हॉटस्टार मार्फत करण्यात आली. यात कुणालच्याही सिनेमाचा समावेश होता मात्र या पत्रकार परिषदेत त्याला आमंत्रण देण्यात आलं नव्हतं.

मुंबई- बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा विषय सुरु असतानाच सोमवारी पुन्हा एकदा काही कलाकारांना याचा प्रत्यय आला आहे. अभिनेता विद्युत जामवाल यासंदर्भात बोलता झाल्यानंतर आता अभिनेता कुणाल खेमुलाही राग अनावर झाला आहे. नुकतीच एक ऑनलाईन पत्रकार परिषद पार पडली त्यात ७ बडे सिनेमे ऑनलाईन रिलीज करण्याची घोषणा डिस्ने हॉटस्टार मार्फत करण्यात आली. यात कुणालच्याही सिनेमाचा समावेश होता मात्र या पत्रकार परिषदेत त्याला आमंत्रण देण्यात आलं नसल्याने या घराणेशाही विरोधात त्याने देखीस आवाज उचचला आहे.

हे ही वाचा: आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव, स्वतः आमीरने दिली माहिती

सोमवारी डिस्ने हॉटस्टारने एक ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन ७ बडे सिनेमे ऑनलाईन रिलीज करणार असल्याची घोषणा केली. यावेळी अक्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट्ट, वरुण धवन आणि अभिषेक बच्चन हजर होते. कुणाल खेमुचा लुटकेस सिनेमा देखील या ७ सिनेमांच्या रिलीजमध्ये होता मात्र यात त्याला सामिल करुन न घेतल्याने तो चांगलाच भडकला आहे. कुणालने त्याचा राग सोशल मिडियावर व्यक्त केला आहे.

कुणालने त्याच्या ट्विटरवरुन ट्विट करत लिहिलं आहे की, 'इज्जत आणि प्रेम मागुन मिळत नाही, कोणी नाही दिलं तरी त्याने आपण लहान होत नाही. फक्त सामना करण्यासाठी मैदान एकसारखं द्या, झेप आम्ही देखील उंच घेऊ शकतो. '

कुणालच्या या ट्विटनंतर त्याच्या समर्थनार्थ अनेक चाहते उभे राहिले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की 'आम्ही सुशांतला गमवलं आहे तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत.' कुणालने खुलेआम पोल खोल केल्याने, चाहते खुश आहेत. तसंच सुशांतच्या मृत्युनंतर याविषयी आवाज उठवणं हा एक सकारात्मक बदल असल्याचं लोकांना जाणवत आहे.

या पत्रकार परिषदेत सामील करुन न घेतल्याने विद्युत जामवालने देखील नाराजी व्यक्त केली होती. विद्युतने लिहिलं होतं, 'निश्चितंच मोठी घोषणा, सात सिनेमे रिलीज होणार आहेत मात्र केवळ पाचजणांनाच प्रतिनिधीच्या लायक समजलं गेलं. २ सिनेमांना ना कोणती सूचना मिळाली आणि नाही आमंत्रण. लांबचा पल्ला गाठायचा आहे. हे असंच सुरु राहणार आहे.' 

यावर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर देत विद्युतला म्हटलं होतं 'कारण तू आऊटसायडर आहेस. सिंपल.'      

lootcase actor kunal kemmu blow up for not being involved in social media announcement  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lootcase actor kunal kemmu blow up for not being involved in social media announcement