'इतिहास मला लक्षात ठेवेल' म्हणणारे मनमोहनसिंग येताहेत..!

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार) प्रसिद्ध झाला. तब्बल दहा वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलरही कालच झळकला होता. 

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी डॉ. मनमोहनसिंग यांची भूमिका वठविली आहे. हा चित्रपट 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिला ट्रेलर झळकण्यापूर्वीच चित्रपटाच्या विषयामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. राजकीय वर्तुळामध्येही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वीच डॉ. मनमोहनसिंग यांची कारकिर्द पडद्यावर झळकणार असल्याने या 'टायमिंग'ला महत्त्व असल्याचीही चर्चा आहे. या चित्रपटातील डॉ. मनमोहनसिंग यांचे नेतृत्त्व, सोनिया गांधी यांचा 'रिमोट कंट्रोल' आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हे वादाचे विषय ठरू शकतात. 

पहिला ट्रेलर झळकण्यापूर्वीच चित्रपटाच्या विषयामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. राजकीय वर्तुळामध्येही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. 

अनुपम खेर यांच्यासह आहना कुमारा आणि अर्जुन माथूर हेदेखील प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. आहना कुमाराने प्रियांका गांधी यांची, तर अर्जुन माथूरने राहुल गांधी यांची भूमिका साकारली आहे. सुझान बर्नर्टने सोनिया गांधी यांची भूमिका वठविली आहे, तर सूत्रधाराच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. 

'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चे दिग्दर्शन विजय दत्त यांनी केले आहे, तर हन्सल मेहता यांनी लेखन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anupam Kher portrays Dr Manmohan Singh in the film The Accidental Prime Minister