Kirron Kher Birthday: प्रिय किरण... बायकोच्या वाढदिवशी अनुपम खेर यांची खास पोस्ट..

आज अभिनेत्री किरण खेर यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने अनुपम खेर भावुक झाले.
Anupam Kher wished Kirron Kher on her birthday with an emotional note
Anupam Kher wished Kirron Kher on her birthday with an emotional notesakal

kiron kher : बॉलीवूड अभिनेत्री किरण खेर यांचे नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली.

एवढेच नाही सध्या त्या रिअलिटी शो मध्ये जज म्हणून काम करतानाही त्यांच्या खेळकर आणि काहीशा खोडकर स्वभावाने रसिकांचे मनोरंजन होते. अशा किरण खेर यांचा आज वाढदिवस.

त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी काही खास फोटो शेअर करत किरण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..

(Anupam Kher wished Kirron Kher on her birthday with an emotional note)

Anupam Kher wished Kirron Kher on her birthday with an emotional note
Gautami Patil: धन्य ती माऊली! गौतमी पाटीलच्या आईचा पहिला Video व्हायरल..

किरण खेर आज 72 वर्षांच्या झाल्या. किरण खेर यांच्याकडे प्रचंड आदराने पाहिले जाते. कारण रंगभूमी गाजवून बॉलीवुडमध्ये आलेली अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या अभिनयाचे, भाषेचे, बोलण्याचे आजही असंख्य चाहते आहेत.

त्यांचा एक सर्वात मोठा चाहता म्हणजे त्यांचे पती अभिनेते अनुपम खेर. अनुपम आणि त्यांची भेट एका नाटकाच्या दरम्यान झाली आणि मग पुढे मैत्री, प्रेम आणि लग्न अशी त्यांची कहाणी आहे. दोघांनीही एकमेकांसाठी आपले जूने जोडीदार सोडून, घटस्फोट घेऊन ते एकत्र आले. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरीही तितकीच भन्नाट आहे.

आज त्यांच्या मैत्रीला जवळपास 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पती अनुपम खेर यांनी यांन भावुक पोस्ट शेयर केली आहे.

Anupam Kher wished Kirron Kher on her birthday with an emotional note
Ashadhi Wari: आजि म्या देखिली पंढरी; नाचताती वारकरी.. संतांचे 'हे' अभंग सांगतात कशी करावी वारी..

काही जून फोटो शेयर करत अनुपम खेर लिहितात की, ( kiron kher) प्रिय किरण.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! देव तुम्हाला दीर्घ, आनंदी, शांत आणि निरोगी आयुष्य देवो! आपण जवळपासस 50 वर्षे एकमेकांना ओळखत आहोत.'

'मी तुला पहिल्यांदा 1974 मध्ये चंदीगडच्या इंडियन थियटर विभागात पाहिलं होतं. तू पंजाब युनिव्हर्सिटीची स्टार विद्यार्थी होती. अभ्यासात हुशार, राष्ट्रीय बॅडमिंटनपटू, प्रस्थापित थिएटर अभिनेत्री आणि लार्जर दॅन लाइफ...'

'या सगळ्याला आता 50 वर्षे झाली. पण तू अजूनही तशीच आहेस किंवा आहे त्यापेक्षा जास्तच चांगली झालीस. तू आयुष्यातील सर्वात कठीण लढाया लढलीस आणि नेहमीच एक विजेती म्हणून पुढे आलीस. तू तुझ्या व्यक्तिमत्त्वाने आणि गोड स्वभावाने लोकांचे प्रेम, विश्वास जिंकलास आणि जिंकत राहा. तुझ्यासाठी खूपसारं प्रेम आणि प्रार्थना..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com