JNUAttack : अनुरागने बदलला ट्विटरचा प्रोफाइल फोटो, थेट मोदी-शहांना केलं टार्गेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सरकारवर टीका करणाऱ्या अनुरागने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अनुरागने नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलला आहे.

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हणामारीविरोधात देशभरातून विरोध होतोय. यात बॉलिवूड कलाकारही आक्रमकपणे पुढे दिसतात. अशातच, काल दिग्दर्शक अनुराग कश्यप याने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत पुन्हा चर्चेला विषय जिला आहे. यामुळेच ट्विटरवर #IStandwithAnuragKashyap हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अनुराग नेहमीच खुलेपणाने सरकारवर टीका करत असतो आणि देशात सुरु असलेल्या घटनांवर तो पुढे येऊन बोलतो. सरकारवर टीका करणाऱ्या अनुरागने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. 

अनुरागने नुकताच त्याच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. या प्रोफाइल फोटोमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कैरीकेचरचा फोटो लावला आहे. जेएनयूमधील घटनेचा निषेध म्हणून त्याने हा फोटो लावल्याचं स्पष्ट होत आहे. 
अनुरागच्या या नवीन प्रोफाइल फोटोला आतापर्यंत जवळपास 34 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत. पण, अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करत असल्याचा आरोप करत अनेकांनी त्याच्या अटकेची मागणीही केली आहे. जितचे या फोटोला लाइक्स मिळत आहेत त्याचप्रमाणे अनुरागवर प्रचंड टीका आणि विरोधही केला जात आहे.काल अपडेट केलेल्या या प्रोफाइल फोटोनंतर आज मात्र अनुरागच्या अकाउंटचा फोटो बदललेला दिसतो आहे. 

#IStandwithAnuragKashyap अनुरागने 'हा' डायलॉग खरा करून दाखवला!

तसेच काल (ता. 6) संध्याकाळी जेएनयूमधील घटनेचा निषेध म्हणून बॉलिवूड कलाकार व दिग्दर्शकांनी निषेध केला. यातही अनुराग हिरीरीने पुढे दिसला. अनुरागसोबत या आंदोलनात दिया मिर्झा, तापसी पन्नू, झोया अख्तर व इतर कलाकार होते. नेटकरी म्हणत आहेत की अनुराग आम्हाला तुझा अभिमान आहे, या आंदोलनात आम्ही तुझ्यासोबत आहोत.

देशभरातून या आंदोलनाविरुद्ध निषेध केला जातोय. मुंबई, हैदराबाद, लखनौ, बंगळूर अशा मुख्य शहरांमध्ये विद्यार्थी या घटनाचा निषेध करताना दिसतायत. याचेच पडसाद आता सोशल मीडियावरही दिसू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag kashyap changed twitter profile photo targeted narendra modi and amit shah