अनुरागची नवी गलफ्रेंड चक्क एवढ्या वर्षांची

वृत्तसंस्था
Tuesday, 10 September 2019

अनुराग सध्या शुभ्रा शेट्टी नावाच्या एका मुलीला डेट करत असून, तिचं वय 25 असल्यातचं बोललं जातं. सुरुवातीला अनुरागनं त्याचं हे नातं मीडियापासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्यानं स्वतःचा सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याची कबुली सुद्धा दिली.

मुंबई : प्रेम आधळं असतं असे म्हणतात ना, त्याचाच प्रत्यय दिग्दर्शक अनुराग कश्यपचे नवीन प्रेमप्रकरण पाहून येतो आहे.  बॉलिवूड करिअरपेक्षा अनुरागचं खासगी जीवनच जास्त चर्चेत राहीलं आहे. बॉलिवूडमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या अनुराग आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दरम्यान, मूळचा गोरखपूरचा असेलेला अनुराग कश्यप वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखला जातो. मात्र सध्या तो त्याच्या लव्ह लाइफबद्दल प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, अनुरागची आत्तापर्यंत दोन लग्न होऊन त्यानंतर घटस्फोट सुद्धा झाले आहेत आणि सध्या तो स्वतःहून 22 वर्षांनी लहान असलेल्या एका तरुणीला डेट करत आहे. अनुराग सध्या शुभ्रा शेट्टी नावाच्या एका मुलीला डेट करत असून, तिचं वय 25 असल्यातचं बोललं जातं. सुरुवातीला अनुरागनं त्याचं हे नातं मीडियापासून लपवून ठेवलं होतं. मात्र त्यानं स्वतःचा सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याची कबुली सुद्धा दिली.

अनुरागनं पहिल्यांदा 2003 मध्ये आरती बजाजशी लग्न केलं होतं. त्याचं हे नातं 2009 मध्ये तुटलं आणि हे दोघं वेगळे झाले. त्यानंतर अनुरागनं 2011 मध्ये अभिनेत्री कल्की कोचलीनशी लग्न केलं मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2015 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर अनुरागनं तिसरं लग्न केलं नसलं तरीही मागच्या बऱ्याच काळापासून शुभ्राला डेट करत आहे. 

एका मुलाखतीत अनुरागनं त्याच्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला. अनुराग म्हणाला, ‘सर्वांना प्रेम करायचा अधिकार. मी प्रेमाचा खूप आदर करतो. मग ते 90 व्या वर्षी झालेलं प्रेम असो वा आणखी काही. मी तुटलेलं हृदय घेऊन जगण्यात वेळ वाया घालवू शकत नाही. ब्रेकअप नंतर दुःखी होऊन जगण्यापेक्षा मी पुन्हा प्रेमात पडण्यावर विश्वास ठेवतो.’ अनुरागच्या मुलीसोबत त्याची गर्लफ्रेंड शूभ्राचं बॉन्डिंग खूप चांगलं असल्याचं बोललं जातं. अनुराग अनेकदा शुभ्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag kashyap dating 22 year younger girlfriend