esakal | अनुराग कश्यपने जाहीर केले सुशांतच्या मॅनेजरसोबतचे व्हॉट्सअप चॅट्स, म्हणाला 'माफ करा पण...'
sakal

बोलून बातमी शोधा

anurag kshayp on sushant

अनुराग कश्यपने म्हटलंय की सुशांत सिंह राजपूतला त्यांच्यासोबत काम करायती इच्छा होती. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे अनुराग कश्यपला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं.

अनुराग कश्यपने जाहीर केले सुशांतच्या मॅनेजरसोबतचे व्हॉट्सअप चॅट्स, म्हणाला 'माफ करा पण...'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत आता आपल्यात नाही. सुशांत मृत्यु प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी तपास करत आहेत. या प्रकरणाच्या प्रत्येक बारीक गोष्टींचा तपास केला जात आहे. तसंच सुशांत बाबतीत अनेकजण वेगवेगळे खुलासे करताना देखील दिसत आहेत. यावेळी बॉलीवूडचे दिग्दर्शक-निर्माते अनुराग कश्यप यांनी सुशांतशी संबंधित मोठा खुलासा केला आहे.

हे ही वाचा: 'कंगना रनौत बनणार महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री?' वाचा असं कोण म्हणालंय  

अनुराग कश्यपने म्हटलंय की सुशांत सिंह राजपूतला त्यांच्यासोबत काम करायती इच्छा होती. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे अनुराग कश्यपला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं. याबाबतचा खुलासा स्वतः अनुराग कश्यपने त्याच्या ट्विटरवरुन केला आहे. त्याने ट्विटरवर सुशांतच्या मॅनेजरसोबतचे व्हॉट्सअप चॅट जाहीर केले आहेत. या चॅटमध्ये अनुराग कश्यपने सुशांतला त्रासलेली व्यक्ती असं म्हटलं आहे.

अनुराग कश्यपने हे चॅट जाहीर करत त्याच्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'मला माफ करा मला असं करावं लागत आहे. त्याच्या मॅनेजरसोबत 14 जून ला हे चॅट झालं होतं. आत्तापर्यंत हे जाहीर करण्याची गरज वाटली नव्हती मात्र आता जाहीर करावंसं वाटलं. हो. मला त्याच्यासोबत काम करायचं नव्हतं आणि यामागे माझी स्वतःची काही वैयक्तिक कारणं देखील होती.' अनुरागने हे चॅट्स आत्ता जाहीर केले आहेत जेव्हा सुशांत प्रकरणात रियाला एनसीबीने अटक केली आहे.    

anurag kashyap reveal in chat the late actor manager urge to work with sushant singh rajput  

loading image