'कंगना रनौत बनणार महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री?' वाचा असं कोण म्हणालंय

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

मुंबईला पोहोचण्याआधीच बीएमसीच्या कर्मचा-यांनी कंगनाच्या ऑफीसच्या बेकायदेशीर भागावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. तर कंगनानेही सोशल मिडियावरुन यावर प्रत्युत्तर दिलं होतं.

मुंबई-  बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफीसवर बीएमसीने तोडफोड केली. ती मुंबईला पोहोचण्याआधीच बीएमसीच्या कर्मचा-यांनी कंगनाच्या ऑफीसच्या बेकायदेशीर भागावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. तर कंगनानेही सोशल मिडियावरुन यावर प्रत्युत्तर दिलं होतं. तिने उद्धव ठाकरेंना 'तेरा भी घमंड तुटेगा' असं म्हटलंय. यादरम्यान प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाचा महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री म्हणत बॉलीवूडला टोला लगावला आहे. 

बर्थडे स्पेशल: ज्या बंगल्याबाहेर फोटोशूटसाठी अक्षय कुमारला वॉचमनने दिला होता नकार त्याच आलिशान बंगल्याचा आज आहे मालक  

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, 'असं वाटतंय की कंगना रनौत महाराष्ट्राची आगामी मुख्यमंत्री होईल आणि जेव्हा असं होईल तेव्हा Bollywoodians ना Timbektoo मध्ये शिफ्ट व्हावं लागेल.' राम गोपाल वर्मा यांच्या या ट्विटवर लगेचच प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला आहे. काही जणांनी त्यांच्या या कमेंटचं समर्थन केलं आहे तर काहींनी ही गोष्ट नकारात्मक दृष्टीने घेतली आहे. एकीकडे कंगना प्रकरणावर बॉलीवूडमधील काही मंडळींच्या मौन बाळगण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत तर दुसरीकडे काही सेलिब्रिटींचा कंगनाला पाठिंबा मिळताना दिसून येतोय. 

कंगना मुंबईत पोहोचली आहे आणि तिच्या ऑफीसच्या तुटलेल्या अनेक व्हिडिओंसोबत तिने एका व्हिडिओमध्ये तिचा जबाब देखील सादर केला आहे. यामध्ये तिने म्हटलंय, 'उद्धव ठाकरे, तुला काय वाटलं की मुवी माफियांसोबत मिळून तु माझ्यासोबत बदला घेतला आहेस. आज मेरा घर टूटा है कल तेरा घमंड टूटेगा.. हे काळाचं चक्र आहे. लक्षात ठेव हे नेहमी एकसारखं नसतं.'     

ram gopal varma says looks like kangana ranaut for sure is going to be the next cm of maharashtra  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram gopal varma says looks like kangana ranaut for sure is going to be the next cm of maharashtra