esakal | अनुराग कश्यपचा नवा खुलासा, 'हंसी तो फंसी'मध्ये सुशांतसोबत काम करण्यासाठी परिणीती चोप्राने दिला होता नकार
sakal

बोलून बातमी शोधा

anurag on pariniti sushant

एका मुलाखती दरम्यान अनुराग कश्यपने सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना सांगितलं की त्यांना सुशांतसोबत काम करायचं नव्हतं कारण तो कामाच्या दरम्यान कोणती ना कोणती अडचण उभी करायचा.

अनुराग कश्यपचा नवा खुलासा, 'हंसी तो फंसी'मध्ये सुशांतसोबत काम करण्यासाठी परिणीती चोप्राने दिला होता नकार

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या मॅनेजरसोबत झालेलं व्हॉट्सअप चॅट सोशल मिडियावर शेअर केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच एका मुलाखती दरम्यान अनुराग कश्यपने सुशांत सिंह राजपूतविषयी बोलताना सांगितलं की त्यांना सुशांतसोबत काम करायचं नव्हतं कारण तो कामाच्या दरम्यान कोणती ना कोणती अडचण उभी करायचा.

हे ही वाचा:  'बिग बॉस १४'मध्ये यावेळी नसणार शारिरीक खेळ, दर आठवड्याला होणार स्पर्धकांची कोरोना टेस्ट  

रिपोर्ट्सनुसार अनुराग कश्यपने २०१४ मध्ये 'हंसी तो फंसी' या सिनेमासाठी सुशांत सिंह राजपूतचं नाव घेतलं होतं. त्यावेळी तो सिनेमासाठी अभिनेत्रीच्या शोधात होता. त्यानंतर या सिनेमासाठी परिणीती चोप्रासोबत बोलणं केलं. मात्र त्यावेळी परिणीती सुशांतचं नाव ऐकून म्हणाली की तिला टीव्ही अभिनेत्यासोबत काम करायचं नाहीये. तेव्हा अनुरागने तिला सांगितलं होतं की तो केवळ टीव्ही अभिनेता नाहीये तर त्याने 'काय पो छे', 'पीके' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

याव्यतिरिक्त अनुराग कश्यपने त्याच्या मुलाखतीत हे देखील सांगितलं की, 'परिणीती चोप्रा त्यावेळी यशराज फिल्म्सच्या 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमात काम करत होती. परिणीती यशराज फिल्म्सकडे गेली तीने त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला बोलवलं आणि या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर सुशांतने आमच्याशी काहीच संपर्क साधला नाही. सुशांतला यशराजसोबत काम करणं त्यावेळी योग्य वाटलं.'

या दोन्ही सिनेमांमध्ये परिणिती मुख्य भूमिकेत होती. तिने 'हंसी तो फंसी' सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केलं तर 'शुद्ध देसी रोमान्स'मध्ये सुशांतसोबतची जोडी प्रेक्षकांना पसंत पडली.   

anurag kashyap says parineeti chopra rejected hasee toh phasee with sushant singh rajput