Coronavirus: अनुष्का-दीपिकाने केलं #SafeHandsChallange पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 March 2020

अभिनेत्री दीपिका पदूकोणनंतर आता अनुष्का शर्माने सेफ हँड्स चॅलेंज केलं पूर्ण

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं पाहायला मिळतंय...जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक जनरल डॉक्टर टेड्रोस एधानोम यांनी सोशल मिडीयावर सेफ ङँड्स चॅलेंजची मोहीम राबवली होती..त्यातंच कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी अनेक दिग्गज पूढे येतायेत आणि याविषयी जागरुकता निर्माण करतायेत..त्यातंच अभिनेत्री दीपिका पदूकोणनंतर आता अनुष्का शर्माने सेफ हँड्स चॅलेंज घेतलंय आणि ते पूर्ण केलंय..

बापरे: कोरोनामुळे अडचणीत अजय देवगण, 350 लोकांची टीम सज्ज मात्र..

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला संसर्ग म्हणून घोषित केलंय तर दुसरीकडे भारतात याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलंय..यासगळ्यात कोरोनापासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनेक दिग्गजांना सेफ हँड्स चॅलेंज मोहिमेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सांगितलंय..

नुकतंच दीपिका पदूकोणने सोशल मिडियावर आपला व्हिडिओ पोस्ट केला होता..या व्हिडिओमध्ये तीने तोंडाला मास्क लावलं होतं आणि स्वच्छता म्हणून ती  हात स्वच्छ धुताना दिसत होती..याच साखळीमध्ये आता अनुष्का शर्मा पुढे आलीये..सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का आपले हात स्वच्छ कसे करावेत हे सांगताना दिसतेय...साबणाने हात स्वच्छ करुन मग टॉवेलला पुसतेय आणि त्यानंतर टिश्यु पेपरने नळ देखील स्वच्छ करतेय जेणेकरुन त्यावरील किटाणू निघून जातील...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#AnushkaSharma #Coronavirus #Covid19 #WHO #SafeHands

A post shared by Entertainment Fan Page (@facc2911) on

याआधी दीपिकाने हे चॅलेंज पूर्ण करुन तिने प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो, स्विस टेनिस खेळाडू रोजर फेडरर आणि क्रिकेटर विराट कोहली यांना सेफ हँड्स चॅलेंजसाठी नॉमिनेट केलंय..

आत्तापर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात 7,976 लोकांना जीव गमवावा लागलाय..याच सगळ्याात जास्त चीनमध्ये 3,237 त्यानंतर इटलीमध्ये 2,503 लोकं मृत्यमुखी पडली आहेत..भारतात आत्तापर्यंत कोरोनामुळे 3 लोकांचा जीव गेलाय..

anushka sharma and deepika padukon completes safehands challenge


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anushka sharma and deepika padukon completes safehands challenge