Virat Kohli Birthday: एका शॅम्पूच्या जाहिरातीने एकत्र आणलं.. कशी आहे अनुष्का - विराटची लव्हस्टोरी पहा

अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त अनुष्का आणि विराट यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया..
virat kohli birthday
virat kohli birthdaySAKAL

Anushka Sharma - Virat Kohli Love Story: आज विराट कोहलीचा वाढदिवस. विराट सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. विराट यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विक्रमांवर विक्रम रचत आहे.

विराटची पत्नी अनुष्का शर्मा हि बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री. अनुष्का शर्माने पिके, बँड बाजा बारात, परी अशा सिनेमांमधून कमाल भूमिका साकारल्या. आज विराटच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊय अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी

virat kohli birthday
Maharashtra Shaheer: मा. शरद पवार 'महाराष्ट्र शाहीर' पाहायला उपस्थित, सोबत पत्नी आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. ते पहिल्यांदा कसे भेटले आणि प्रेमात पडले याबद्दल आश्चर्य वाटत आहे? एका शॅम्पूच्या जाहिरातीने विराट आणि अनुष्का यांना एकत्र आणलं. काय होती या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.. जुलै 2013 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका शॅम्पू ब्रँडच्या जाहिरातीच्या सेटवर भेटले आणि जाहिरातीतील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे डेटिंगच्या अफवा पसरल्या.

जानेवारी २०१४ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मुंबईला परतल्यावर हॉटेलमध्ये जाण्याऐवजी अनुष्काने पाठवलेल्या कारमधून विराट कोहली तिला भेटायला गेला. आणि विराट- अनुष्का यांच्याबद्दलची चर्चा अधिकच वाढली.

फेब्रुवारी २०१४ मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ऑकलंडमध्ये हातात हात घालून फिरताना कॅमेऱ्यात पकडले गेले. जिथे भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता. मार्च 2014 मध्ये बॉम्बे वेल्वेटच्या शूटिंगदरम्यान अनुष्का शर्माला भेटण्यासाठी विराट कोहली श्रीलंकेला रवाना झाला.

virat kohli birthday
कोल्हापुरात निळाई पसरली, जेव्हा दीपा चालत आली.. Deepa Parab Chaudhari

एप्रिल 2014 मध्ये विराट कोहली पुन्हा जोधपूर विमानतळावर दिसला. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माला भेटण्यासाठी तो NH10 च्या एक महिन्याच्या शूटसाठी तिथे होता. पुढे एका मॅच मध्ये विराटने अनुष्काकडे बॅट उंचावून फ्लाईंग किस केलं. तेव्हा या दोघांच्या डेटिंग अफवा सत्यात उतरल्या. अशाप्रकारे एकमेकांना डेट केल्यावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांना वामिका ही मुलगी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com