
अनुष्काची घर-करिअर सांभाळताना दमछाक; म्हणाली,'एका आईच्या अडचणी समजून घ्या'
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) काही काळासाठी मोठ्या पडद्यापासून लांब होती. प्रेग्नेंसी आणि लॉकडाऊन यामुळे तिनं कामातून ब्रेक घेतला होता. पण आता ती पुन्हा कामाला सुरुवात करतेय. तिनं मार्च २०२२ मध्ये खरंतर सांगितलं होतं की,ती आता सिनेमांची निर्मिती करणार नाही. ती आता फक्त अभिनय करणार. आणि तिचं सगळं लक्ष ती अभिनयावरच केंद्रित करणार आहे. म्हणूनच तिनं आपल्या क्लीन सेल्ट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी आपला भाऊ कर्णेशवर सोपवली होती.
हेही वाचा: RRR Hindi OTT Release Date: नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाहिर केली तारीख
अनुष्काच्या मते,''आई बनल्यानंतर तिला आता फक्त अभिनेत्री म्हणूनच काम करायचं आहे. आपल्या त्याच करिअरला तिला पुढे न्यायचं आहे. पण मुलगी वमिकाच्या जन्मानंतर अनुष्काला पुन्हा कामात बिझी होणं थोडं कठीण होऊन बसलं आहे. तिचं असं मानणं आहे की पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपलं वर्कलाइफ बॅलन्स करणं खूप कठीण आहे''.
हेही वाचा: 'तारक मेहता' च्या चाहत्यांना मोठा झटका; मुख्य अभिनेत्याचा मालिकेला रामराम?
अनुष्काचं म्हणणं आहे की,'' एका ऑफिसला जाणाऱ्या आईची आपलं काम आणि घर दोन्ही सांभाळताना कसरत ही होतेच. तिचं असं म्हणणं आहे की आजही समाजात लोकं बाहेर जाऊन काम करणाऱ्या आईच्या भावना आणि तिच्या आयुष्यातील अडचणींना मुळीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत,कारण आजही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. इथे फक्त पुरुषच हुकूम चालवतात. अनुष्कानं खुलासा केला आहे की,तिला आजही विश्वास बसत नाही की ती एका मुलीची आई झाली आहे. तिला आता महिलांप्रती मनात अधिक सम्मान आणि प्रेम निर्माण झालं आहे असं ती म्हणाली. तिच्या मते,आजपर्यंत तिनं महिलांच्या हितासंबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे पण आता आई झाल्यानंतर अधिक प्रेमळ भावना महिलांप्रती निर्माण झालीय पण याच भावनेनं,जबाबदारीनं आपण अधिक ताकदवर बनलो आहोत असंही अनुष्का म्हणाली आहे''.
हेही वाचा: Plastic surgery नंतर कन्नड अभिनेत्रीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू
अनुष्का पुढे म्हणाली की,''जर महिलांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला तर त्या अधिक दर्जेदार काम करू शकतात. अनुष्काच्या मते, समाजात काही असे पुरुष देखील आहेत जे महिलांप्रती कायम दया आणि सहानुभुती दाखवतात. पण मग या गोष्टींमुळे कधी कधी वर्क कल्चर कठीण होऊन बसतं. अनुष्काचं म्हणणं आहे की,आपल्याला एकत्रितपणे या गोष्टीवर विचार करायला हवा की या जगात एका मुलाचं पालन-पोषण ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे''
हेही वाचा: Pankaj Udhas Birthday: 'तेव्हा विलासराव देशमुख होते म्हणूनच मला...'
अनुष्का पुन्हा अभिनयात सक्रिय झाल्यानंतर आता 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमात दिसणार आहे. यात ती महिला इंटरनॅशनल क्रिकेटची माजी कॅप्टन झुलन गोस्वामीची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्कानं यासाठी क्रिकेटचे चांगलेच धडे गिरवल्याचं बोललं जात आहे.
Web Title: Anushka Sharma Feels People Dont Understand The Emotions Of A Working
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..